AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Pradhan Resign : महाराष्ट्रातील हा बडा नेता आता देशाचा शिक्षणमंत्री? थेट पहिलं नाव समोर; आतली माहिती आली!

प्रधान यांच्यानंतर शिक्षणमंत्रिपदाचा कारभार कोणाकडे सोपवला जाणार? असे विचारले जात आहे. नव्या नावाची चर्चा केली जात असतानाच आता दिल्लीच्या राजकारणात मोठं नाव असलेल्या एका बड्या नेत्याने एका नेत्याचं नाव घेतलं आहे. विशेष म्हणजे हे नाव महाराष्ट्रातलंच आहे.

Dharmendra Pradhan Resign : महाराष्ट्रातील हा बडा नेता आता देशाचा शिक्षणमंत्री? थेट पहिलं नाव समोर; आतली माहिती आली!
narendra modi and dharmendra pradhanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 4:32 PM
Share

Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील तरुण एकवटले होते. काहीही झालं तरी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी भूमिका या आंदोलकांची होती. कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, आता प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रधान यांच्यानंतर शिक्षणमंत्रिपदाचा कारभार कोणाकडे सोपवला जाणार? असे विचारले जात आहे. नव्या नावाची चर्चा केली जात असतानाच आता दिल्लीच्या राजकारणात मोठं नाव असलेल्या एका बड्या नेत्याने एका नेत्याचं नाव घेतलं आहे. विशेष म्हणजे हे नाव महाराष्ट्रातलंच आहे.

12 वर्षामध्ये हे प्रथमच असं आंदोलन झालं

उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तरुणांच्या लढ्याचे हे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची आंदोलकांपुढे न झुकण्याची भाषा होती. पण आता 12 वर्षामध्ये हे प्रथमच असं आंदोलन झालं आहे. याच आंदोलनामुळे केंद्रिय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. सगळा देश यासाठी तरुणाईचे धन्यवाद मानतो, अशा भावना राऊत यांनी व्यक्त केल्या. तसेच, आजच्या दिवसासाठी तरुणाईला रक्त सांडावं लागलं, हाडं मोडून घ्यावी लागली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

उद्याच्या आंदोलनाला आता विजयी रॅलीचे स्वरुप

प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गटाकडून आंदोलन केले जाणार होते. यावरही आता त्यांनी भाष्य केले आहे. दिल्लीच्या आंदोलनात अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली. उद्याच्या आंदोलनाला आता विजयी रॅलीचे स्वरुप आले आहे. पण 20 मुलांना जीव गमवावा लागला त्यामुळे आम्ही जल्लोष साजरा करणार नाही, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं.

नेमकं कोणाला शिक्षणमंत्रिपद मिळणार?

प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यातील घडाडमोडींना वेग आला आहे. यावरही राऊत यांनी भाष्ये केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपद दिले जाऊ सकते, असे भाकित व्यक्त केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल भाई पटेल हे दिल्लीत जात आहेत. मला असे वाटते की धर्मेंद्र प्रधानांच्या जागी फडणवीसांना संधी मिळू शकते. ते शिकलेले आहेत. त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे. तशी चर्चाही सुरु आहे, अशी महत्त्वाची माहिती राऊत यांनी दिली.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच