AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकरांकडून प्रधान यांच्या राजीनाम्याची चिरफाड; त्या दोन गोष्टींवर ठेवलं बोट

धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी विद्यार्थी जे निर्णय घेतील, त्यांना पाठिंबा असेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांकडून प्रधान यांच्या राजीनाम्याची चिरफाड; त्या दोन गोष्टींवर ठेवलं बोट
| Updated on: Jul 25, 2026 | 7:10 PM
Share

देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे ध्रमेंद्र प्रदान यांनी राजीनामा द्यावा लागला. 12 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा मोदी सरकारच्या कॅबिनेट पदावरील मंत्र्याने राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. आंदोलनात समाजकंटक घुसतात, असं वक्तव्य प्रधान यांनी राजीनाम्यात केलं आहे. त्यांनी 22 जणांनी आत्महत्या केली, याबद्दल त्यांनी कुठलीही खंत व्यक्त केलेली नाही. पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारांचा राजीनाम्यात उल्लेख नाही. नुकसान भरपाई देणार, याबाबत स्पष्टता यायला हवी होती’.

‘धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल टाकलं आहे. जे झुकणार नाही असं म्हणाले त्यांनी आता नाक रगडवले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचा सरकारवर राग आहे, असं दिसतंय . आधी झुरळ हा शब्द, नंतर लाठीचार्जचे व्हिडिओ केलेले आम्हाला बघायला वेळ नाही हे दोन वाक्य त्यांचे होते. नुकसानभरपाई आणि परीक्षेतील सुधारणा याबद्दल सरकार बोलायला तयार नाही, त्यामुळे माघार का घ्यावी. विद्यार्थी जे निर्णय घेतील, त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल, असे त्यांनी सांगितले.

राजीनाम्याआधी आंबेडकरांनी सरकारला दिला होता मोठा इशारा

केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याआधी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला मोठा इशारा दिला होता. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं की, ‘काल कारवाई झाली, ती उशिरा झाली. कारवाईमध्ये काहीशी अशी परिस्थिती आहे. जंतरमंतर विद्यार्थी यांची मागणी आहे की, धर्मेंद्र प्रधान यांचा यांचा राजीनामा झाला पाहिजे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांना प्रतप्रंधान मोदी आणि अमित शहा काढू शकत नाही. येत्या आठवड्याभरात राजीनामा झाला नाही, तर आम्ही लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत’.

‘अभिजीत दिपके यांना मी निरोप पाठवला आहे की, या आंदोलनाला राजकीय स्वरूप येऊ नये याची काळजी घ्यावी. शरद पवार यांना या आंदोलनापासून दूर ठेवा. सर्व लोकप्रतिनिधींनी प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करावी. जो कुणी मागणी करणार नाही, त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहे. राजकीय पक्ष आणि आंदोलकांनी आराखडा ठरवून आंदोलन करावं, असेही ते म्हणाले होते.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच