AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच नाही? ठाकरेंच्या विधनामुळे खळबळ; सांगितलं दिल्लीत काय घडलं?

शातील जनतेवर दबाव टाकला जात होता. जणू काही या देशात लोकं शिल्लक राहिलेले नाही. सध्याची परिस्थिती पाहून मला 'एक मच्छर साला' हा संवाद आठवला. एका झुरळाने या सरकारला झुकवलं आहे. आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेला असं समजू नका, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच नाही? ठाकरेंच्या विधनामुळे खळबळ; सांगितलं दिल्लीत काय घडलं?
uddhav thackeray and dharmendra pradhanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 4:53 PM
Share

Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी मंत्रिपदाची खुर्ची सोडल्याने संपूर्ण देशात जल्लोष केला जात आहे. गेल्या साधारण महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर हजारो तरुण आंदोलन करत होते. कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणजेच सीजेपीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू होते. अखेर या लढ्याला यश मिळाले आहे. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांची जागा कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय शिक्षणमंत्री होऊ शकतात, असे भाकित खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. राऊतांनी हे भाकित व्यक्त केलेले असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत संशय व्यक्त केला आहे.

गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ

मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आज (25 जुलै) पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी 26 जुलै रोजीच्य मुंबईत आयोजित केलेल्या त्यांच्या मोर्चाबाबत माहिती दिली. आमचा हा मोर्चा आता विजयी रॅली असेल, असे ठाकरे बंधू म्हणाले. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचं विधान केलं. गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ आहे. याचं कारण सर्वांना माहीत आहे. मला पहिल्या प्रथम अभिजीत दीपके आणि देशातील सर्व तरुणांचं अभिनंदन करायचं आहे. न घाबरता त्यांना समर्थन देणाऱ्या पालकांचं अभिनंदन करायचं आहे. या आंदोलनाने देशातील तरुणांना भयाच्या छायेतून काढलं आहे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून…

तसेच, देशातील जनतेवर दबाव टाकला जात होता. जणू काही या देशात लोकं शिल्लक राहिलेले नाही. सध्याची परिस्थिती पाहून मला ‘एक मच्छर साला’ हा संवाद आठवला. एका झुरळाने या सरकारला झुकवलं आहे. आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेला असं समजू नका. देशातील युवा शक्ती एकत्र आली तर काय होऊ शकते हे दिसतं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.

त्यांनी राजीनामा दिला की…

तसलेच, दीपकेचं ट्विट पाहिलं. त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही. त्यांच्या दोन मागण्या बाकी आहेत. प्रधान यांच्या राजीनाम्याची महत्त्वाची मागणी होती. ती झाली. त्यांनी राजीनामा दिला की खातेबदल झालाय ते कळेल, असं महत्त्वाचं विधान ठाकरे यांनी केलंय. या ठाकरे यांनी प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत संशय व्यक्त केल्याचं बोललं जातंय. दरम्यान, आता 26 जुलै रोजीच्या ठाकरे यांच्या विजयी रॅलीत काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच