This is the Beginning of the End… मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा, युवाशक्तीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “हा विद्यार्थ्यांचा आणि युवाशक्तीचा प्रचंड विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. मात्र, सध्या येणाऱ्या बातम्यांनुसार धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. तो राजीनामा स्वीकारण्यात आला आहे का? तसेच त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था काय करण्यात आली आहे किंवा शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.”
पुढे बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टीका करत म्हटले, “माझ्या मते हा लोकशाहीचा अत्यंत मोठा विजय आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात जबाबदारी स्वीकारून दिलेला हा पहिला राजीनामा आहे. त्यामुळे एका शब्दात सांगायचे झाल्यास, ‘This is the beginning of the end.’ आता सरकार फार काळ टिकणार नाही. मोदी सरकारची ही मनमानी कारभाराची पद्धत देशातील जनता यापुढे स्वीकारणार नाही,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
Published on: Jul 25, 2026 03:47 PM
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...