घरी पहिल्यांदाच तुळशी विवाह करणार आहात? आधीच जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे नियम
Tulsi Vivah 2026: यंदा 21 ते 24 नोव्हेंबरदरम्यान तुळशी विवाह करता येणार आहे. तुम्ही यंदा घरी पहिल्यांदाच तुळशी विवाह करणार असाल आधीच काही नियम जाणून घ्या.

तुळशीचं लग्न होतं नाही तोवर दिवाळी संपत नाही. यंदा यंदा 21 ते 24 नोव्हेंबरदरम्यान तुळशी विवाह करता येणार आहे. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी उत्सवात आणि पारंपरिक पद्धतीने देवी तुळशी आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह सोहळा पार पडतो. हिंदू पंचांगानुसार, हा उत्सव कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला साजरा केला जातो. मात्र काही प्रदेशांत एकादशीच्या दिवशीही तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाह केल्याने ‘कन्यादाना’चे पुण्य प्राप्त होते आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते. तुळशी विवाह तुम्ही पहिल्यांदाच घरी करणार असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचं आहे.
१) चूकही तोडू नयेत तुळशीची पाने
तुळशी विवाहाच्या दिवशी माता तुळशीची पूजा करताना, तिची पाने तोडू नये. धार्मिक मान्यतेनुसार, द्वादशी तिथीला तुळशीची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे, पूजेसाठी तुळशीच्या पानांची आवश्यकता असल्यास, ती आदल्या दिवशीच आणून ठेवावीत.
२) तुळशी विवाहापूर्वी पूजेची स्वच्छ करा
कोणत्याही शुभ विधी किंवा समारंभापूर्वी जिथे पूजा करणार असाल तिथली स्वच्छता करा. तुळशीचे रोप आणि त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ आणि करा. कुंडी स्वच्छ करण्यासोबतच, पूजेसाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची मांडणी करून ठेवा. तसेच, तुळशीच्या रोपाला फुले, रांगोळी आणि दिव्यांनी सजवून पूजास्थळी एक सुंदर व भक्तिमय वातावरण निर्माण करू शकता.
३) माता तुळशीला वधूसारखे सजवा!
तुळशी विवाहाच्या वेळी माता तुळशीला सजवणे ही एक महत्त्वाची परंपरा मानली जाते. या दिवशी तुळशीच्या रोपाला वधूसारखे सजवले जाते. यामध्ये तुळशीला लाल ओढणी, तिला फुले, हार व इतर सजावटीच्या वस्तूंनी छान सजवलं जाते. पूजेच्या दिवशी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी, आवश्यक असलेली सर्व सामग्री आधीच तयार ठेवून घेणे योग्य ठरेल.
४) पूजेच्या साहित्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष द्या
तुलसी विवाहाची पूजा विधीवत पार पाडण्यासाठी, पूजेत वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, पूजेमध्ये ताजी फुले, फळे आणि शुद्ध प्रसाद वापरणे शुभ मानले जाते. याउलट, कोमेजलेली फुले, अस्वच्छ भांडी किंवा खराब झालेला प्रसाद वापरणे टाळावे. त्यामुळे, पूजेसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य जसे की कुंकू, अक्षता, दिवा, मिठाई आणि इतर आवश्यक वस्तू आधीच गोळा करून ठेवा, जेणेकरून पूजा छान होऊ शकेल.
५) तुळशी विवाहाच्या वेळी दिवे लावताना घ्यायची काळजी
तुळशी विवाहाच्या निमित्ताने, संध्याकाळच्या वेळी माता तुळशीजवळ दिवा लावण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी दिवा लावणेअत्यंत शुभ मानले जाते. मात्र, असे करताना सुरक्षिततेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुळशीच्या रोपाभोवती वाळलेली पाने किंवा सजावटीच्या वस्तू असल्यास आगीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, दिवा सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि तो पेटता असताना कधीही त्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा तो तसाच सोडून देऊ नका.