
हिंदू धर्मामध्ये महादेवाला देवांचे देव म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, तुमच्या जीवनामध्ये प्रगती होत नसेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे होत असतील तर तुम्ही महादेवाची पूजा करावी. महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल त्यासोबतच तुम्ही आयष्यात यशस्वी होता. धार्मिक श्रद्धेनुसार, महादेवाला समर्पित केलेला प्रदोष व्रत सर्व त्रास आणि समस्या दूर करणारा दिवस मानला जातो. या व्रताचा महिमा शिवपुराणात आढळतो. प्रत्येक महिन्याला शुक्र पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. या दिवशी भक्त महादेवाची आणि माता पार्वतीची पूजा करतात. वेगवेगळ्या दिवशी येणाऱ्या प्रदोष व्रताचा महिमाही वेगळा आहे.
वैदिक कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 9 मे रोजी दुपारी 2:56 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मे रोजी संध्याकाळी 5:29 वाजता संपेल. अशा परिस्थितीत वैशाख महिन्यातील दुसरा प्रदोष व्रत 9 मे रोजी ठेवण्यात येईल. शुक्रवारी त्रयोदशी तिथी असल्याने याला शुक्र प्रदोष व्रत म्हटले जाईल. प्रदोष व्रताचे व्रत आणि उपवास केल्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि महादेवाचा आशिर्वाद तुम्हाला प्राप्त होतो.
पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या दुसऱ्या प्रदोष व्रताला भोलेनाथाची पूजा करण्याचा शुभ काळ संध्याकाळी 7:02 ते 9:08 पर्यंत असेल. या काळात, भाविकांना पूजा करण्यासाठी एकूण 2 तास 6 मिनिटे मिळतील. धार्मिक श्रद्धेनुसार, देवांचे देव महादेव यांना समर्पित केलेला हा प्रदोष व्रत पाळल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुऊन जातात आणि त्याला शिवधाम प्राप्त होतो. पौराणिक कथेनुसार, चंद्राला क्षयरोग झाला होता, ज्यामुळे तो मृत्युसारखी वेदना सहन करत होता. भगवान शिवाने तो दोष दूर केला आणि त्रयोदशीच्या दिवशी त्याला पुन्हा जीवन दिले. म्हणून या दिवसाला प्रदोष असे नाव पडले. प्रदोष व्रत हे महादेवाला समर्पित आहे आणि ते प्रत्येक पंधरवड्याच्या त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत एकादशी व्रताइतकेच महत्त्वाचे मानले जाते. प्रदोष व्रत केल्याने भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो, जीवनात सुख-समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, असे म्हटले जाते. प्रदोष व्रत केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. हे व्रत केल्याने जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता येते, असे मानले जाते. प्रदोष व्रत केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मन शांत होते. संततीप्राप्तीसाठीही हे व्रत केले जाते. प्रदोष व्रत केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि संबंध चांगले होतात. प्रदोष व्रत केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो. हे व्रत केल्याने पापे आणि कष्टांपासून मुक्ती मिळते.
प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे….
सकाळची पूजा – सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर, भगवान शंकराची विधिवत पूजा करा.
शिवलिंगाला अर्पण – शिवलिंगावर गंगाजल, दूध, दही, मध, आणि बेलपत्र अर्पण करा.
शिवपुराण – शिवपुराणाचे पठण करा आणि शिव चालीसाचे वाचन करा.
उपवास – प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास ठेवा.
दान – या दिवशी फळे, कपडे, अन्नधान्य, काळे तीळ आणि गाय दान केल्याने पुण्य मिळते, असे मानले जाते.
सात्विक आहार – उपवासादरम्यान सात्विक आहार घ्या.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.