Vastu Shastra : घरात सतत भांडणं होतायेत? मग हे उपाय कराच, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र महत्त्वाचं मानलं जातं. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra :  घरात सतत भांडणं होतायेत? मग हे उपाय कराच, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastu shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 14, 2026 | 7:47 PM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र महत्त्वाचं मानलं जातं. अनेकदा आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात नकळतपणे काही चुका करत असतो, या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. जेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो. तेव्हा आपल्याला काही समस्या जाणवू लागतात. अनेकदा असं होतं की कोणतंही कारण नसताना घरात सारखे भांडणं होत राहतात. कुटुंबप्रमुखाचं आणि कुटुंबातील इतर सदस्यांचं पटत नाही, पत्नी-पत्नीमध्ये मतभेद होतात, त्यामुळे घरात गृहकलह होतो. असं का होतं? तर ते तुमच्या घरात असलेल्या वास्तुदोषामुळे देखील होऊ शकतं. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत, या उपायांमुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल, घरात सुख, समृद्धी आणि शांती येईल, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

तुळशीजवळ दिवा लावा – अनेकदा आपल्यासोबत बाहेरून घरात नकारात्मक ऊर्जा येते. जेव्हा या ऊर्जेचा प्रभाव वाढतो, तेव्हा आपल्या आयुष्यात अचानक समस्या निर्माण होतात. काहीही कारण नसताना घरात अचानक भांडणं सुरू होतात. घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात. असं होऊ नये, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तो म्हणजे तुळशीजवळ रोज सकाळी आणि सायंकाळच्या वेळी न चुकता दिवा लावावा. या उपयामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. घरात सुख समृद्धी आणि शांती येते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

घराची पश्चिम दिशा – घराची पश्चिम दिशा ही शनि महाराजांची असते, त्यामुळे या दिशेला कधीही अवजड सामान, जसं की लोखंडी वस्तू, किंवा रद्दी वगैरे अशा गोष्टी ठेवू नका. कारण अशा वस्तूंमुळे घरात शनिदोष निर्माण होतो, त्यामुळे घरात गृहकलही वाढतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

घराचा उंबरा – तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा हा सर्वात महत्त्वाचा असतो, कारण इथूनच सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते, त्यामुळे नित्यनियमाने दररोज घराचा उंबरा हा मिठाच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेतला पाहिजे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us