Vastu Shastra : घराच्या या दिशेला चुकूनही ठेवू नका लाल रंगांच्या वस्तू, अन्यथा सुखी संसाराला लागेल ग्रहण

वास्तुशास्त्रानुसार घरातल्या प्रत्येक वस्तूची एक विशिष्ट दिशा ठरलेली असते, जेव्हा आपण चुकीच्या वस्तू चुकीच्या ठिकाणी किंवा दिशेला ठेवतो, त्यावेळी घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास आपल्यावर अनेक संकट येऊ शकतात, जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगतं?

Vastu Shastra : घराच्या या दिशेला चुकूनही ठेवू नका लाल रंगांच्या वस्तू, अन्यथा सुखी संसाराला लागेल ग्रहण
वास्तुशास्त्र
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 29, 2026 | 11:15 PM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमचं घर हे वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार असेल तर तुमच्या घरात कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही, तुमचं सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून संरक्षण होते. वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ फक्त तुमचं घर कसं असावं? बेडरूम कोणत्या दिशेला असावी? स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? अथवा देवघराची कोणती दिशा असावी? एवढीच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर तुम्ही तुमच्या घरात दररोज ज्या वस्तू वापरतात, त्याची योग्य जागा कोणती आणि त्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात याबद्दल देखील वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. अनेकदा आपण खूप पैसा कमावून देखील आपल्या हातात पैसा शिल्लक राहत नाही, यासाठी तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण आपल्या नकळत जरी केल्या तरी देखील घरात वास्तुदोष निर्माण होतो, अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची दक्षिण -पश्चिम दिशा ही अत्यंत महत्त्वाची असते. या दिशेला घरातील काही विशिष्ट गोष्टी ठेवणं हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात, हातात पैसा टिकत नाही. व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळत नाही. वास्तुशास्त्रानुसार कधीही घराच्या दक्षिण -पश्चिम दिशेला लाल रंगाच्या वस्तू ठेवू नयेत, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. हातात आलेला पैसा हळुहळु घरातून नष्ट होतो. काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात. त्यामुळे कधीही घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला लाल रंगाच्या वस्तू ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

तसेच वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची पश्चिम दिशा ही नेहमी स्वच्छ आणि मोकळी असावी, कारण पश्चिम दिशा ही शनिची दिशा मानली जाते, जर पश्चिम दिशेला काही अडचण असेल तुम्ही टाकावू वस्तू ठेवलेल्या असतील किंवा भंगार सामान ठेवलेले असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा मध्यभाग हे ब्रह्मस्थान असते, हे ब्रह्मस्थान नेहमी मोकळे असावे, तिथे कोणत्याही वस्तू ठेवू नयेत, तसेच ब्रह्म स्थानावर कोणताही दाब नसावा, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, असंही वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.