
वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? घरातील वस्तूंची रचना कशी असावी याबद्दल तर मार्गदर्शन करण्यात आलचं आहे, मात्र अनेकदा आपल्याला अचानक काही मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो, या गोष्टी घरात वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे देखील घडल्या असण्याची शक्यता असते, त्यामुळे घरातील वास्तुदोष कसा दूर करायचा? घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर करायची? घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी काय प्रयत्न करायचे? याबद्दल देखील वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात ज्या तुमच्या पर्सनल असतात, त्या चुकूनही इतरांसोबत शेअर करू नये, त्यामुळे त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
लग्नाची अंगठी – लग्नाची अंगठी ही एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला खूप प्रिय असते, ही अंगठी म्हणजे पती-पत्नीच्या प्रेमाची निशाणी असते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार तुमच्या लग्नाची अंगठी दुसऱ्या कोणालाही वापरण्यासाठी देऊ नका, कारण त्याचा नकारात्मक परिणाम हा तुमच्या आयुष्यावर पडत असतो. यामुळे पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. पती-पत्नीमध्ये वाद होतात.
मंगळसूत्र – वास्तुशास्त्रानुसार ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे, अशा प्रत्येक महिलेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं, मंगळसूत्राला सौभाग्याचं प्रतिक मानलं जातं. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी महिला आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालतात. मात्र कधीही आपलं मंगळसूत्र इतरांसोबत शेअर केलं नाही पाहिजे, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्याचा परिणाम हा पती-पत्नीच्या नात्यावर होतो.
झाडू – हिंदू धर्मामध्ये झाडूला विशेष महत्त्व आहे. झाडू हे समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घरातील झाडू चुकूनही दुसऱ्या कोणालाच देऊ नये, यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या येऊ शकतात. खर्च वाढू शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
घड्याळ – घड्याळ हे वेळ आणि गतिचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे तुम्ही वापरत असलेलं घड्याळ दुसऱ्या कोणालाही देऊ नका, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)