
हिंदू धर्मानुसार प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित आहे. जसं की सोमवार हा महादेवांना समर्पित आहे, त्यामुळे सोमवारी महादेवांची उपासना केली पाहिजे, असं मानलं जातं. तर मंगळवार हा देवीला समर्पित आहे. त्याचप्रमाणे शनिवार हा दिवस शनि देवांना समर्पित आहे. शनिवारी शनि देवाची उपासना केल्यास आपल्याला सदैव शनि देवांचा आशीर्वाद मिळतो आणि वाईट गोष्टींपासून तसेच आपल्यावर येण्याऱ्या भविष्यातील संकटांपासून आपलं रक्षण होतं असं मानलं जातं. दरम्यान वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या की शनिवारी करू नयेत, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहेत.
शनिवारी काय करू नये?
शनिवार हा शनि देवांना समर्पित आहे. शनिवारी दाढी करणे कटिंग करणं या सारख्या गोष्टी अशुभ मानल्या गेल्या आहेत. यामुळे धनहानी होते. तसेच शनिवार हा शनि देवाचा वार असल्यामुळे या दिवशी दानाला खूप महत्त्व असते, त्यामुळे या दिवशी जर तुमच्या घरात एखादा व्यक्ती आला तर त्याला कधीही उपाशी जाऊ देऊ नका, किंवा कोणी दान मागितले तर त्याला दान द्या. शनिवारी मीठ दान करू नये, मीठाचा संबंध हा लक्ष्मीमाता संबंधी असल्यामुळे मीठ शनिवारीच नाही तर कोणत्याच दिवशी कोणालाही देऊ नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
शनिवारी काय करावं?
शनिवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी, त्यानंतर जर तुमच्या घराशेजारी शनि महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन शनि देवाची पूजा करावी, शनिला तेल अर्पण करावं, काळे तीळ अर्पण करावे, तसेच गरीब आणि गरजू व्यक्तीला दान करावं. शनिवारी शनि देवांची प्रार्थना करावी, त्यामुळे घरातील सर्व अडीअडचणी दूर होतात, एवढंच नाही तर दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्यास घरातील वास्तुदोष नष्ट होतो, असं मानलं जातं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)