
वास्तुशास्त्रामध्ये असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ते जर आपण पाळले नाहीत तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये म्हटलं आहे. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास त्याचा परिणाम हा फक्त तुमच्या एकट्यावर होत नाही , तर कुटुंबातील सर्व सदस्यांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास घरातील शांती नष्ट होते. तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तो लगेच खर्च होतो, तुमच्या हातात टिकत नाही, अचानक कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. व्यवसायात तोटा होतो, नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये अपेक्षित यश मिळत नाही. अशावेळी घरातील वास्तुदोष दूर करणं गरजेचं असतं, त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते, आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
वास्तुदोषाची लक्षणं
सगळ्यात आधी हे जाणून घेऊयात की, असे कोणते संकेत असतात ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला आहे, याची माहिती तुम्हाला मिळते. जर घरात काहीही कारण नसताना दररोज भांडणं होत असतील, पत्नी -पत्नीमध्ये पटत नसेल. तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला आहे, असं समजलं जातं. जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा साध्या -साध्या गोष्टींवरून देखील घरात कडाक्याचे भांडणं होतात, एवढंच नाही तर तुमच्या घरात कायम कोणी न कोणी सारखं आजारी राहात असेल, तरी घरात वास्तुदोष निर्मण झाला असल्याची शक्यता आहे. अनेकदा तुम्ही खूप कष्ट करता, प्रचंड पैसा कमावता, मात्र तुमच्या हातात पैसा शिल्लक राहत नाही, हे देखील एक वास्तुदोषाचं लक्षण आहे. दरम्यान जर तुमच्या घरातील झाडं अचानक सुखले तरी वास्तुदोष आहे, असं धर्मशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
वास्तुदोष कसा दूर करायचा?
वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सर्वात सोपा उपाय सांगण्यात आला आहे, जो की तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी करू शकता. मंगळवारी किंवा शनिवारी सर्व घरात धुप फिरवावा, यावेळी मनात कोणताही नकारात्मक विचार आणू नये, तसेच धूप घरात फिरवत असताना महादेवांची प्रार्थना करावी असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)