
हिंदू धर्मशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो. जसं की रविवार हा सूर्य देवाचा वार आहे. सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे. मंगळवार हा भगवान हनुमान यांना समर्पित आहे, तर बुधवार हा गणपती बाप्पाचा वार आहे. बुधवार गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी काही विशेष उपाय केल्यास, गणपतीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो, गणपती बाप्पााच्या कृपेनं घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात. सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होऊन घरात बरकत येते. घरतील तिजोरी सदैव पैशांनी भरलेली राहते. गणपती ही बुद्धीची देवता असल्यानं मुलांचं अभ्यासात मन एकाग्र होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात सांगितलेल्या या उपायांबद्दल.
उसाच्या रसाचा अभिषेक
जर तुम्ही आर्थिक संकटात सापडला आहात, किंवा कर्जबाजारी झाला आहात कितीही प्रयत्न करून कर्ज फिटत नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये दर बुधवारी गणपतीला उसाच्या रसाचा अभिषेक करावा, गणपतीला उसाच्या रसाचा अभिषेक केल्यास घरातील सर्व संकट दूर होतात. आर्थिक स्थिरता येते, कर्जातून मुक्तता होते. हातात पैसा टिकतो, गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
शमीचे पानं आणि सुपारी अर्पण करा
बुधवारी गणपती बाप्पांना सुपारी आणि शमीचे पान अर्पण करणं अत्यंत शुभ मानण्यात आलं आहे, यामुळे घरातील सर्व समस्या दूर होतात. जर घरावर एखादं आर्थिक संकट येणार असेल किंवा आलं असेल तर त्याचं निवारण होतं. घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.
दुर्वा
दुर्वा गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे, तुम्ही दर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा करून त्यांना दुर्वा अर्पण करू शकता, यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात. घरात जर काही वास्तुदोष असेल तर तो देखील दूर होतो. तसेच घरात वादविवाद भांडणं होत नाहीत. घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.
दान धर्म – जर तुम्ही बुधवारी गरजू व्यक्तींना दान केलं तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं, बुधवारी दान करणं हे शुभ मानलं गेलं आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्यामुळे तुम्हाला मिळतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)