Vastu Shastra : तुम्ही देखील करतात का या चूका? सावधान पडू शकतात महागात, वास्तुशास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करतो, ज्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. जसं की काही कारण नसताना अचानक घरात गृहकलह वाढतो, नवरा बायकोचं पटत नाही. अनेकदा आर्थिक अडचणी येतात, कर्ज वाढतं. या अशा अडचणी का येतात? तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक ऊर्जेचं प्रमाण वाढल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे अशा चुका टाळायला पाहिजे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.
घराच्या दरवाजाची उंची – वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची उंची ही कमी नसावी, या दरवाजामधून माणसांना सहज जाता येता आलं पाहिजे, अशी त्याची उंची असावी, कारण तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हाच ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असतो. याच दरवाजामधून घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.
झोपण्याची दिशा – वास्तुशास्त्रानुसार तुमची झोपण्याची दिशा ही नेहमी पूर्व- पश्चिम असावी, कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. उत्तरेला पाय आणि दक्षिणेला डोके करून झोपणे वास्तुशास्त्रामध्ये शुभ मानलं गेलं आहे.
देवघर – तुमचं देवघर हे नेहमी पूर्व दिशेला असावं, देवघरात कधीही एकाच देवाच्या दोन मूर्ती असू नये, जसं की दोन गणपतीच्या मूर्ती, दोन देवीच्या मूर्ती, किंवा इतर देवाच्या मूर्ती, देवघरात नेहमी एका देवाची एकच मूर्ती असावी, असंही वास्तुशास्त्र सांगतं.
तसेच बाथरूममध्ये देखील कधीही मोकळ्या बकेट ठेवू नयेत, बाथरूममध्ये नेहमी पाण्याने भरलेल्या बकेटच ठेवाव्यात, यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते, असा सल्ला देखील वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. यासोबतच इतर अनेक गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)