
वास्तुशास्त्रानुसार दानाला खूप महत्त्व आहे. दान केल्यामुळे पुण्य मिळतं, आपण मागच्या जन्मात जी पाप कर्म केली आहेत, त्यातून आपला उद्धार होतो, असं धर्मशास्त्रामध्ये म्हटलं आहे. एवढंच नाही तर ज्या व्यक्तीला शनि दोष असतो, त्या व्यक्तीने जर दान केलं तर शनिदेव प्रसन्न होतात, शनिपिडा कमी होते. वास्तुशास्त्रानुसार गुप्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. गुप्तदान म्हणजे आपण जे दान केलं आहे, ते इतर कोणत्याही व्यक्तीला कळू न देणं म्हणजे गुप्त दान. वास्तुशास्त्रानुसार गुप्त दान केल्यास सर्व पाप कर्मातून तुम्हाला मुक्ती मिळते, तुम्हाला मानसिक आणि अध्यात्मिक शांती लाभते, तसेच जो व्यक्ती गुप्तदान करतो, त्याचं नशीब चमकतं, अशा व्यक्तीच्या आयुष्यात कधीच आर्थिक समस्या येत नाहीत.वास्तुशास्त्रामध्ये अशा तीन गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या मंदिरात दान केल्यास तुमच्या भाग्याचा कायपालट होतो. नशीबाची साथ तुम्हाला मिळते.
काडेपेटीचं दान – वास्तुशास्त्रानुसार दिवा लावण्यासाठी काडेपेटीचा उपोयग होतो. घरात किंवा मंदिरात दिवा लावणं हे सकारात्मकतेचं प्रतिक असतं, त्यामुळे अंधाराचा नाश होतो. त्यामुळे मंदिरात काडेपेटीचं गुप्तदान करणं हे खूपच शुभ मानलं गेलं आहे. विशेष करून हनुमान मंदिरामध्ये काडेपेटीचं दान करावं. या दानामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो, अनेक समस्यांमधून तुमची मुक्तता होते.
बसण्याचं आसन – वास्तुशास्त्रानुसार बसण्याचं आसन दान करणं देखील खूप शुभ मानलं जातं, कारण यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी येतात त्या दूर होतात आणि तुम्हाला स्थिर आयुष्य लाभतं.
जल अर्पण करण्याचा तांब्या – वास्तुशास्त्रानुसार जल अर्पण करण्याचा तांब्या दान करणं देखील शुभ मानलं गेलं आहे. यामुळे घरातील अडचणी दूर होतात. जल अर्पण करण्याच्या तांब्याचं गुप्तदान केल्यामुळे घरात बरकत येते. घराची भरभराट होते, आनंदी वातावरण राहतं. त्यामुळे वास्तुशास्त्रात गुप्तदान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.दानामुळे पूर्वजांना शांती मिळून पितृदोष देखील दूर होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)