Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठताच ही झाडं दिसणं असतं अत्यंत शुभ, कामात यश मिळणारच
तुमच्या घरात कोणती झाडं असावीत? आणि कोणती झाडं नसावीत याबद्दल देखील वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात, जी झाडं घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, तर काही झाडं ही घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवतात.

अनेकदा आपण अशा छोट्या-छोट्या चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात कोणती झाडं आहेत? त्याला देखील मोठं महत्त्व आहे. अशी काही झाडं असतात ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. ही झाडं घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये काहीही कारण नसताना सारखी भांडण होणं, अचानक मोठं आर्थिक संकट येणं अशी लक्षणं दिसू लागतता. या उलट अशी काही झाडं आहेत, जी वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानली गेली आहेत, या झाडांमुळे घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मीती होते. तसेच ही झाडं सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहाणं देखील शुभ मानलं गेलं आहे. आज आपण अशाच काही झाडांबद्दल माहिती घेणार आहोत.
तुळस – वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या झाडाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. तसेच हिंदू धर्मामध्ये देखील तुळशीचं प्रचंड महत्त्व आहे. तुळस हे झाडं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अत्यंत प्रिय झाड आहे, ज्या घरात तुळस असते, त्या घरात सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. त्या घरात कधीही पैशांची कमी पडत नाही. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्या -उठल्या तुळशीचं दर्शन करणं शुभ मानलं गेलं आहे.
बेलाचं झाड – बेलाचं झाडं हे महादेवांचं सर्वात आवडतं झाडं आहे. वास्तुशास्त्रामध्ये बेलाच्या झाडला सकारात्मकतेचं प्रतिक मानलं गेलं आहे, त्यामुळे सकाळी-सकाळी बेलाच्या झाडाचं दर्शन करणं अत्यंत शुभ असून, त्यामुळे मनातील सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतात. बेलाची पानं महादेवांना अर्पण केली जातात.
अशोकाचं झाड – वास्तुशास्त्रामध्ये अशोक वृक्षाला अत्यंत शुभ माण्यात आलं आहे, सकाळी झोपेतून उठल्यानंतर अशोकाच्या झाडाचं दर्शन घेतल्यास कामामध्ये कोणतीही अडचण येत नाही, तुम्ही जे काम करणार आहात त्यात यश मिळतं असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये आवळ्याच्या झाडाला देखील अत्यंत शुभ मानण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
