
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी आणि कशी नसावी? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? घरातील सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो ते म्हणजे तुमचं स्वयंपाक घर, कारण याच ठिकाणावरून ऊर्जेचा स्त्रोत तुमच्या संपूर्ण घरात प्रवाहीत होत असतो. त्यामुळे तुमचं स्वयंपाक घर कोणत्या दिशेला आहे, याला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. जर तुमचं स्वयंपाक घर हे योग्य दिशेला असेल तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या कुटुंबावर होतो. घरात सदैव आनंदाचं वातावरण राहातं, त्याबद्दल देखील वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. दरम्यान तुमच्या घरात असलेलं देवघर हा आणखी एक घरातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. जर देवघर बांधताना वास्तुशास्त्राच्या सर्व नियमांचं पालन केल्यास घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते. देवी, देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, आज आपण नवीन देवघर बांधताना काय काळजी घ्यावी? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
ईशान्य दिशा – वास्तुशास्त्रानुसार देवघर हे नेहमी ईशान्य दिशेलाच हवं, कारण ईशान्य दिशा ही देवाची दिशा आहे, त्यामुळे जर तुमचं देवघर हे ईशान्य दिशेला असेल तर त्यामुळे तुमच्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहाते, वाईट गोष्टींपासून तुमचं संरक्षण होतं. घरात स्थिरता राहाते, आर्थिक अडचणी येत नाहीत.
बेडरूममध्ये देव घर नसावं- वास्तुशास्त्रानुसार कधीही तुमच्या बेडरूममध्ये तुमचं देवघर नसावं, त्याचा नकारात्म परिणाम हा तुमच्यावर होतो, घरात गृहकलह वाढतात. घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
पूर्वजांचे फोटो- वास्तुशास्त्रानुसार देवघरात चुकूनही पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पूर्वजाचे फोटो हे तुमच्या घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीला लावावेत.
देवघरातील मूर्ती – देवघरातील मूर्ती किंवा फोटोचे तोंड अशा पद्धतीने करावे जे पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला येतील असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)