Vastu Shastra: हातात पैसाच टिकत नाही, मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, घरात येईल बरकत

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. अनेकदा असं होतं की आपण खूप पैसे कमावतो, मात्र आपल्या हातात पैसा शिल्लक राहत नाही. त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. याच उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra: हातात पैसाच टिकत नाही, मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, घरात येईल बरकत
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 7:16 PM

माणसाच्या आयुष्यात काही न काही समस्या सुरूच असतात. जसं की अनेकदा आर्थिक समस्या निर्माण होतात, कर्ज वाढतं, तुम्ही कर्ज कितीही फेडण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते वाढतच जातं. पैसा हातात टिकत नाही. काहीही कारण नसताना कुटुंबातील इतर सदस्यांसोबत सारखे वाद होतात. पती-पत्नीचं पटत नाही. या सर्व गोष्टींमागे काही न काही कारण असतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा देखील अशा समस्या निर्माण होऊ शकतात. घरात जर सतत नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल तर त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचं प्रमाण कमी होतं, यामुळे घरातील ऊर्जेचं संतुलन बिघडतं आणि तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात. त्यामुळे घरातील ऊर्जेचं संतुलन कायम टिकून राहावं, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच काही उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होऊन, घराला बरकत प्राप्त होईल. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

कर्जमुक्तीसाठी उपाय – जर तुमच्यावर खूप कर्ज झालं असेल आणि ते कर्ज फिटतच नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तो म्हणजे गणपतीची पूजा, दरोज सकाळी गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरी देवघरात असलेल्या गणपतीची पूजा करावी. गणपतीला दररोज एक लाल फूल अर्पण करावं, गणपतीच्या आशीर्वादाने तुमच्यावरील कर्ज लवकर दूर होतं.

Loading...

हातात पैसा टिकत नसेल तर – तुमच्या हातात प्रचंड पैसा येतो, मात्र तो जर हातात टिकत नसेल तर त्यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे जिथे कुठे देवाचा भंडारा असेल तर त्या भंडाऱ्याच्या अदल्या दिवशी तिथे मीठ दान करावं, या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us