Vastu Shastra : तुमच्याही घरात असतील या वस्तू तर घरात कधीच टिकणार नाही पैसा, वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास पैसा टिकत नाही. काहीही कारण नसताना घरात सतत वादविवाद होऊ शकतात. आज आपण वास्तुदोष कसा दूर? करायचा आणि कोणत्या गोष्टींमुळे तो निर्माण होऊ शकतो? याची माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : तुमच्याही घरात असतील या वस्तू तर घरात कधीच टिकणार नाही पैसा, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 6:59 PM

वास्तुशास्त्राला हिंदू धर्मशास्त्रामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा सगळं सुरळीत सुरू असताना देखील तुमच्या आयुष्यात अचानक काही अडचणी येण्यास सुरुवात होते. जसं की घरात काहीही कारण नसताना कुटुंब प्रमुखाचं घरातील इतर सदस्यांसोबत भांडणं होतं. पती-पत्नीमध्ये सतत वाद होत राहतात. पती-पत्नीचं पटत नाही. कधी-कधी तर परिस्थिती एवढी बिकट बनते की गोष्ट थेट घटस्फोटापर्यंत देखील जाऊ शकते. एवढंच नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुमच्या आयुष्यात काही मोठे आर्थिक संकट देखील येऊ शकतात, त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला असा प्रश्न देखील पडला असेल की घरात वास्तुदोष कशामुळे निर्माण होतो. तर घरात वास्तुदोष निर्माण होण्यास अनेक कारणं कारणीभूत असतात. मात्र अशा काही वस्तू असतात, ज्या तुम्ही तुमच्या घरात ठेवता कामा नये, कारण अशा गोष्टींमुळे देखील तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? आणि वास्तुशास्त्र त्याबद्दल काय सांगतं? याबद्दल जाणून घेऊयात.

घराची उत्तर दिशा – वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ आणि मोकळी असावी, याचाच अर्थ या दिशेला कुठल्याही प्रकारची अडचण नसावी. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची अत्यंत प्रिय दिशा आहे. त्यामुळे या दिशेला कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये, त्यासाठी घराच्या उत्तर दिशेला रद्दी, अवजड आणि लोखंडी सामान ठेवू नये, तसेच उत्तर दिशेच्या भिंतीला कुबेराचा एक फोटो देखील असावा, असं वास्तुशास्त्र सांगतं.

युद्धाचे प्रसंग असलेले फोटो, मूर्ती – तसेच वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात युद्धाचे प्रसंग असलेल्या मुर्ती किंवा फोटो असतील तर अशा मूर्ती, प्रतिमा घरात ठेवणं हे अशुभ मानलं जातं. कारण यामुळे घरात गृहकलह वाढतात, त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us