Vastu Shastra : जर तुमच्याही घरात असतील हे वास्तुदोष, तर मिळतं आजारांना आमंत्रण

जर एखाद्या घरात वास्तुदोष निर्माण झाला तर त्याचा परिणाम हा केवळ आर्थिक स्थितीवरच होत नाही, तर त्याचा परिणाम हा तुमच्या आरोग्यावर देखील होऊ शकतो, आज आपण असेच काही वास्तुदोष आणि त्यावरील उपाय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : जर तुमच्याही घरात असतील हे वास्तुदोष, तर मिळतं आजारांना आमंत्रण
वास्तुशास्त्र
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 25, 2026 | 8:24 PM

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? वस्तुंची योग्य दिशा कशी असावी? अशा अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अनेकदा आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. ज्याचा परिणाम हा तुमच्या केवळ आर्थिक स्थितीवरच होत नाही, तर त्यामुळे तुम्हाला विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील ब्रह्म स्थान आणि आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. तुमच्या घराच्या मध्यभागी जी मोकळी जागा असते तिला ब्रह्म स्थान म्हटलं जातं. ही जागा नेहमी मोकळी असावी, ब्रह्म स्थानावर कोणताही दाब नसावा असं वास्तुशास्त्र सांगतं. जर ब्रह्म स्थान हे मोकळं नसेल तर विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आजच्या काळात घरं ही छोटी-छोटी आहेत, त्यामुळे घराच्या मध्यभागी मोकळी जागा असणं शक्यच नाही, परंतु तुमच्या हॉलच्या मध्यभागी कुठलंही अवजड सामान ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

घराची दक्षिण दिशा – वास्तुशास्त्रानुसार घराची दक्षिण दिशा ही कधीही मोकळी असू नये, दक्षिण दिशा मोकळी असणं हे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानलं जातं, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. त्यामुळे या दिशेकडून सतत नकारात्मक ऊर्जा प्रवाहीत होत असते. त्यामुळे घराची दक्षिण दिशा ही कधीही मोकळी असू नये, दक्षिण दिशा ही जर मोकळी असेल तर त्यामुळे घरात आजारपण वाढतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला मुख्य दरवाजा देखील असू नये, असं देखील म्हटलं जातं. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावा.

बेडखाली या वस्तू ठेवू नये – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडखाली कधीही भंगार सामान, टाकाऊ वस्तू किंवा वापरात नसलेल्या वस्तू ठेवू नये, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर त्याचा परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीसोबतच तुमच्या आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे बेडखालची जागा ही नेहमी स्वच्छ असावी.

घरात अंधार असू नये – तुमचं घर हे नेहमी स्वच्छ सुर्यप्रकाशात असावं, यामुळे घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. तुम्हाला उत्तर आरोग्य लाभतं सोबतच आर्थिक आघाडीवर देखील तुम्हाला यश मिळत, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)