Vastu Shastra : रस्त्यात पडलेल्या या पाच वस्तू चुकूनही घरी घेऊन जाऊ नका, कंगाल व्हाल
वास्तुशास्त्रानुसार कधीही रस्त्यावर पडलेली वस्तू घरात आणू नये, कारण अशा वस्तूंमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते. नकारात्मक ऊर्जेमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, ज्याचा परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर तसेच मानसिक स्थितीवर देखील होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

वास्तुशास्त्रानुसार रस्ता हे सार्वजनिक ठिकाणं असल्यामुळे रस्त्यावरून दररोज हजारो लोक जा ये करतात.अशावेळी अनेकदा या लोकांची एखादी वस्तू कुठेतरी रस्त्यात पडते, किंवा काही जण मुद्दाम देखील टाकतात, जे लोक काही विशिष्ट वस्तू मुद्दाम रस्त्यावर फेकतात त्या वस्तू या नकारात्मक ऊर्जेशी संबंधित असू शकतात. अनेकजण मोठी चूक करतात, अशा वस्तू जर रस्त्यावर सापडल्या की त्या थेट घरात घेऊन येतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार रस्त्यावर सापडलेल्या अशा वस्तू घरात आणणे अशुभ मानलं गेलं आहे. कारण या वस्तू नकारात्मक ऊर्जेशी संबंधित असतात. जेव्हा तुम्ही अशा वस्तू तुमच्या घरात आणता, तेव्हा ज्या व्यक्तीची वस्तू हरवली आहे, किंवा त्याने मुद्दाम टाकली आहे, त्याचे सर्व दोष संपतात, आणि ते दोष तुमच्या पाठिमागे लागतात. घरात अचानक नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्या ऊर्जेचा परिणाम हा तुमच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर सुद्ध होतो. त्यामुळे कधीही रस्त्यावर पडलेल्या वस्तू घरी आणू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्दल.
पुजाच्या सामानाला हात लावू नका – जर तुम्हाला रस्त्याच्या मध्यमागी नारळ, लिंबू, लाल कापड, कुंकू अशा वस्तू आढळून आल्या तर त्यांना चूकनही हात लावू नका, अशा वस्तू रस्त्यात सापडणं याचा अर्थ ती कोणीतरी विशेष पूजा केलेली असू शकते, किंवा तो तंत्र, मंत्राचा देखील प्रकार असू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर अशा वस्तू घरात आणल्या तर या वस्तूंसोबतच सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती देखील तुमच्या घरात प्रवेश करते, त्यामुळे अशा वस्तुंना कधीही हात लावू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
तुटलेले डागिने घरात आणू नका – जर तुम्हाला रस्त्यात कुठेही तुटलेले डागिने दिसले तर अशा डागिन्यांना कधीही घरात घेऊन येण्याची चूक करू नका. कारण असे डागिने हे एखाद्या व्यक्तीच्या दुर्भाग्याचे प्रतिक असू शकतात, असे डागिने तुम्ही जर घरात आणले तर त्या व्यक्तीच्या अडचणी दूर होतात, परंतु तुमच्या घरात अडचणी वाढतात.
विशिष्ट प्रकारचे लाल रंगाचे दोरे, धागे किंवा ताबीज – जर तुम्हाला रस्त्यात कुठेही लाल रंगाचे दोरे सापडले किंवा एखादं ताबीज सापडलं तर त्याला कधीही हात लावू नका असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. यासोबतच एखाद्या चौकात टाकलेल्या वस्तू, आणि चौकात सापडलेले पैसे देखील घरात आणू नका, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)