Vastu Shastra : या तीन चुका आयुष्यात कधीच करू नका, घरात सतत होत राहतील भांडणं, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला, तर त्याच्या आयुष्यात विविध समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुदोष दूर कसा करायचा? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : या तीन चुका आयुष्यात कधीच करू नका, घरात सतत होत राहतील भांडणं, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastu shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 7:50 PM

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात? तुम्ही तुमच्या घरात ज्या वस्तू ठेवल्या आहेत, त्यांची योग्य दिशा कोणती? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये. तर जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, जसं की पती-पत्नीचं पटत नाही. घरात सतत भाडंण होत राहतात. एवढंच नाही तर घरात पैसा टिकत नाही. अशा प्रत्येक समस्यावेर अध्यात्मिक दृष्टीकोणातून काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या आयुष्यात न कळत अशा काही चुका करत असतो, ज्यामुळे काहीही कारण नसताना भांडणं वाढू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वादविवाद होतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं?

घराची कडी सातत्याने वाजवणं – वास्तुशास्त्रानुसार घरातील कडी ही कधीही जास्त आदळ आपट करू नये. तसेच घराचा मुख्य दरवाजा देखील जास्त आदळ-आपट करू नये. कारण यामुळे तुमचं घर अशांत बनतं. कुंटुबातील सदस्यांसोबत कुटुंब प्रमुखाचे भांडणं होऊ शकतात. त्यामुळे कधीही घराची कडी वाजू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, घरात नेमही शांतता असावी.

महादेवांना लाला फूल वाहू नका – वास्तुशास्त्रानुसार भगवान महादेव यांना कधीही पूजेच्यावेळी लाल फूल अर्पण करू नये, महादेवांना पुजेच्यावेळी नेहमी पांढरे फूलच अर्पण करावं. जर महादेवांना लाल फूल अर्पण केलं तर तुमच्या घरात वाद-विवाद वाढू शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच महादेवांना चुकूनही तुळस देखील अर्पण करू नये.

गणपतीला तुळस अर्पण करू नका- वास्तुशास्त्रानुसार गणपतीला कधीही तुळस अर्पण करू नये. गणपतीला नेहमी दुर्वाच अर्पण कराव्यात दुर्वा अर्पण केल्यास गणपती बप्पाचा आशीर्वाद सदैव तु्मच्यासोबत राहतो. तुमची प्रगती होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us