Vastu Shastra : ही एक चूक कधीच करू नका, हातात पैसाच टिकणार नाही, वास्तुशास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं माण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही चूक करतो, ज्यामुळे पैसा आपल्या हातता टिकत नाही. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत.

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं माण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात कळत नकळत अशा अनेक चुका करत असतो, ज्यामुळे हातात पैसा टिकत नाहीत. अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. ज्या घरात सतत नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, अशा घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. जेव्हा एखाद्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो, तेव्हा त्या घरातील ऊर्जा संतुलन बिघडतं. थोडक्यात काय तर घरात वास्तुदोष तयार होतो. ज्या घरात वास्तुदोष असतो, त्या घरात अनेक समस्या निर्माण होतात. जसं की अशा घरात कधीही पैसा टिकत नाही, कायम पैशांची अडचण भासते. तुम्ही पैसा कितीही कमावला तरी तो कमीच पडतो. एवढंच नाही तर काहीही कराण नसताना घरात सतत भांडणं होतात. महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर करणं गरजेचं असतं, ऊर्जा संतुलन साधलं गेलं पाहिजे, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यामुळे तुमच्या घरातील या समस्या दूर होऊ शकतात. चला तर मग आज आपण यातीलच काही उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. पाहूयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
घराच्या खिडक्या – वास्तुशास्त्रानुसार काही लोकांना सवय असते, की ते त्यांच्या घराच्या खिडक्या नेहमी बंद ठेवतात, ते कधीही आपल्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवत नाहीत. परंतु वास्तुशास्त्रानुसार ही एक चुकीची सवय आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. तसेच खिडक्या बंद असल्यामुळे बाहेरची स्वच्छ हवा घरात येत नाही. त्यामुळे घरात कोंदट वातावरण निर्माण होतं, ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर देखील होतो. तुमची चिडचिड वाढते, त्यामुळे घराच्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवाव्यात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
तसेच अनेकांना बाहेरून आल्यानंतर लगेचच स्वंयपाक घर किंवा घराच्या इतर भागांमध्ये जाण्याची सवय असते, मात्र असं न करता तुम्ही जेव्हा बाहेरून येता, तेव्हा सर्वात आधी बाथरूममध्ये जाऊन पाय धुतले पाहिजेत आणि मगच घरात प्रवेश केला पाहिजे, असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)