Vastu Shastra : दिव्यासंबंधी या तीन चुका पडू शकतात महागात, घरात येते गरीबी, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार दिव्याला प्रचंड महत्त्व आहे. सकाळी अंघोळ झाल्यानंतर आणि सायंकाळच्या वेळी घरात दिवा लावला गेलाच पाहिजे असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. परंतु अनेक लोक दिवा लावताना नकळतपणे काही चुका करतात, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.

हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये दिव्याला पवित्रता आणि सुख, शांती याचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळेच सकाळी अंघोळ केल्यानंतर पहिला दिवा हा देवघराच्या समोर लावावा, दुसरा दिवा हा तुळशी जवळ लावावा आणि तिसरा दिवा हा घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबर्याजवळ लावावा असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जो व्यक्ती दररोज सकाळी आणि सायंकाळी या तीन ठिकाणी दिवा लावतो, त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कधीही धनाची कमी भासत नाही, घरात सुख, शांती समृद्धी येते. तसे त्याच्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, असं
वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
परंतु अनेकदा आपण नकळतपणे दिवा लावताना काही चुका करतो, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सकारात्मक ऊर्जा कमी होते. परिणामी ऊर्जा संतुलन बिघडून घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, त्या घरावर अनेक संकट येऊ शकतात. कायम आर्थिक अडचण जाणवत राहते. चला तर मग जाणून घेऊयात दिवा लावताना कोणत्या चुका करू नयेत आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात? त्याबद्दल.
दिव्याने दिवा लावू नका – अनेकांना सवय असते, ती म्हणजे बरेच लोक दिव्याने दिवा पेटवतात. परंतु वास्तुशास्त्रामध्ये याला अशुभ माण्यात आलं आहे. दिव्याने दिवा कधीही पेटवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. यामुळे घरात पैसा टिकत नाही, तुम्ही कितीही पैसा कमावला तरी त्याची बचत होत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
दिवा कधीही दक्षिण दिशेला लावू नका- दिव्याचं तोंड हे नेही पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावं, दिव्याचं तोंड कधीही दक्षिण दिशेला करू नये. दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते, त्यामुळे या दिशेला दिव्याचं तोंड असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
दिवा कधीही फुंकर मारून मालवू नये – वास्तुशास्त्रानुसार दिवा कधीही फुंकर घालवून मालवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)