Vastu Shastra: रविवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय; आयुष्यच बदलून जाईल, सर्व आर्थिक संकटं होतील दूर
हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित असतो. प्रत्येक वारी करण्याची उपासना आणि उपाय देखील वेगवेगळे असतात. आज आपण रविवारी केल्या जाणाऱ्या काही खास उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे तुमचे सर्व प्रकारची आर्थिक संकट दूर होतात.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या नं कोणत्या देवतेला समर्पित आहे. रविवार हा सूर्य देवतेला समर्पित असतो. सूर्य देवतेला तेज आणि गतीच प्रतिक मानलं जातं. जो व्यक्ती दररोज सूर्य देवतेची उपासना करतो, अशा व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडत नाही, तसेच त्याच्यावर येणारी सर्व प्रकारची संकटं आधीच नष्ट होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. रविवार हा सूर्य देवतेला समर्पित आहे, त्यामुळे वास्तुशास्त्रात सूर्य देवाशी संबंधित असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे तुम्ही रविवारी केले तर सूर्य देवता तुमच्यावर प्रसन्न होते. सूर्य देवतेच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे संकटं नष्ट होतात. तसेच भविष्यात देखील तुमच्यावर कोणतंही संकट येत नाही. जे लोक कर्जबाजारी झाले आहेत, खूप कष्ट करून देखील पैसे फिटत नाहीयेत, तर अशा लोकांनी हे उपाय आवश्य करावे असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.
दुधाचा ग्लास – रविवारी रात्री झोपताना एक दुधाने भरलेला ग्लास तुमच्या उशीजवळ ठेवा, त्यानंतर हे दूध सकाळी एखाद्या बाभळीच्या झाडाला अर्पण करा, या उपायामुळे सूर्य देव प्रसन्न होतात. सूर्य देवतेची सदैव तुमच्यावर कृपा राहते. तुमच्या मार्गात येणारी सर्व आर्थिक संकट दूर होतात. जर तुम्ही कर्जबाजारी असाल तर कर्ज देखील हळुहळु फिटण्यास सुरुवात होते. घराला बरकत प्राप्त होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
झाडू दान करा – रविवारी तीन झाडूंची खरेदी करावी, त्यानंतर हे झाडू दुसर्या दिवशी तुमच्या घराशेजारी असलेल्या मंदिरात दान करावेत. यामुळे तुम्हाला दानाचं तर पुण्य मिळतंच परंतु तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात. ज्या व्यक्तीचे सतत आपल्या पत्नीसोबत भांडणं होतात, अशा व्यक्तीने हा उपाय केला पाहिजे, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. या उपायामुळे तुमच्या मागची सर्व प्रकारची इडापिडा दूर होते.
गायत्री मंत्राचा जप – जर कोणाला आरोग्याच्या समस्या असतील तर अशा लोकांनी रविवारी गायत्री मंत्राचा जप करावा, यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील, तुम्हाला सूर्य नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)