AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियन जहाजांवर हल्ला केल्यास सोडणार नाही, पुतीन यांचा युरोपियन देशांना इशारा

Russia Europe Tensions : रशियाने युरोपियन देशांना गंभीर इशारा दिला आहे. जर युरोपीय देशांनी रशियाच्या व्यापारी जहाजांवर कारवाई करून ती जप्त करण्यास सुरुवात केली, तर रशियाही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल असं पुतीन यांनी म्हटलं आहे.

रशियन जहाजांवर हल्ला केल्यास सोडणार नाही, पुतीन यांचा युरोपियन देशांना इशारा
Vladimir putin warning to europeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 12, 2026 | 10:58 PM
Share

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युरोपियन देशांना गंभीर इशारा दिला आहे. जर युरोपीय देशांनी रशियाच्या व्यापारी जहाजांवर कारवाई करून ती जप्त करण्यास सुरुवात केली, तर रशियाही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल. रशियाच्या पॅसिफिक फ्लीटच्या कमांडरने सांगितले की, रशियाला शत्रू मानणाऱ्या देशांच्या परदेशी जहाजांची तपासणी करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी रशियन नौदल तयार आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाच्या सुदूर पूर्व भागात सुरू असलेल्या नौदलाच्या सरावावर देखरेख करताना पुतिन यांनी हे वक्तव्य केले. ईयूने शेकडो जहाजांवर नवीन निर्बंध लागू केले असून, काही जहाजे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी रोखण्यातही आले आहे. युरोपियन युनियनकडून रशियाच्या कथित शॅडो फ्लीटवर दबाव वाढवला जात असतानाच पुतिन यांनी हा इशारा दिला आहे.

रशियाची प्रत्युत्तराची तयारी

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट केले की, जर रशियाच्या व्यापारी जहाजांना लक्ष्य केले गेले, तर आम्ही युरोपीय जहाजांवर कारवाई करू शकतो. पॅसिफिक फ्लीटच्या कमांडर्ससोबत झालेल्या बैठकीत बोलताना पुतिन म्हणाले की, युरोपीय देशांनी रशियन जहाजांना रोखण्याचा किंवा जप्त करण्याचा प्रयत्न केल्यास रशिया त्याला प्रत्युत्तर देईल. त्यांनी पुढे सांगितले की, रशियाची प्रतिक्रिया केवळ ज्या समुद्री भागात रशियन जहाजांना लक्ष्य केले गेले आहे, त्यापुरती मर्यादित राहणार नाही तर जिथे आवश्यक आणि योग्य वाटेल, तिथे कारवाई केली जाईल.

युरोपची योजना काय ?

रशियाच्या शॅडो फ्लीटचा भाग असल्याचा संशय असलेल्या जहाजांना रोखण्याच्या आणि जप्त करण्याच्या प्रयत्नांना युरोपीय देशांकडून वेग आला आहे. पाश्चिमात्य निर्बंध असूनही रशियाचा समुद्री व्यापार सुरू ठेवण्यासाठी या जहाजांचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच युरोपीय देश आक्रमक झाले आहेत. आता रशियानेही आक्रमक भूमिका जाहीर केल्याने या भागात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुतिन यांच्या या ताज्या इशाऱ्यामुळे युरोपीय देशांनी रशियन जहाजे जप्त करण्याच्या योजनेची अंमलबजावणी केल्यास आगामी काळात समुद्रात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

Follow Us
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल