Vastu Shastra : दगड, लाकूड की धातू दारावर कोणती नेमप्लेट सर्वात शुभ? घराची होईल भरभराट

जेव्हा आपण नवीन घर खरेदी करतो, तेव्हा आपण मोठ्या उत्साहाने आपल्या नावाची नेमप्लेट दरवाजावर लावतो, परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की दारावर दगड, लाकूड की धातू यापैकी कशाची नेम प्लेट लावणं हे अधिक शुभ असतं? आज आपण त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : दगड, लाकूड की धातू दारावर कोणती नेमप्लेट सर्वात शुभ? घराची होईल भरभराट
Vastu Shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 8:04 PM

आपण जेव्हा नवं घर खरेदी करतो, तेव्हा आपण आपल्या घरावर न चुकता आपल्या नावाची नेमप्लेट लावतो. यामुळे लोकांना देखील हे कळतं की हे आपलं घर आहे. परंतु नेम प्लेटचं काम केवळ तुमची ओळख लोकांना सांगणे किंवा तुमच्या घराची ओळख लोकांना सांगणे एवढंच नाही तर वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घराला जी नेम प्लेट लावता त्याचा संबंध हा थेट तुमच्या सुख समृद्धीशी जोडलेला असतो. बाजारामध्ये विक्रीसाठी अनेक आकर्षक नेमप्लेट येतात. काही या धातूच्या असतात,तर काही दगडापासून बनवलेल्या असतात, तर काही लाकडापासून बनवलेल्या असतात. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की घराच्या दरवाजावर नेमकी कोणती नेमप्लेट लावावी? दगडाची, धातूची की लाकडाची? आज या संदर्भांत वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

लाकडाची नेम प्लेट – वास्तुशास्त्रामध्ये लाकडाला अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये लाकडाला स्थिरता, समृद्धी आणि प्रगतीचं कारण मानलं गेलं आहे. त्यामुळे घराच्या दरवाजावर लाकडाची नेम प्लेट लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. सर्व साराधारणपणे तुम्ही साग, मोहगणी, सीसम आणि आंब्याच्या लाकडापासून बनवलेली नेमप्लेट तुमच्या घरात लावू शकतात.

Loading...

दगडाची नेम प्लेट – वास्तुशास्त्रामध्ये दगडाचा संबंध थेट पृथ्वीशी आहे. दगड हा स्थिरतेच प्रतिक आहे. तसेच वास्तुशास्त्रामध्ये दगडाला ऊर्जेचं प्रतिक देखील मानलं जातं. त्यामुळे दरवाजावर दगडापासून बनवलेली नेमप्लेट जरी तुम्ही लावली तरी देखील ते शुभ मानलं जातं. ज्या घरावर दगडाची नेम प्लेट असते, अशा घरात कधीही ऊर्जेची कमी नसते, कारण दगडाचा संबंध थेट पृ्थ्वीशी आहे.

धातूची नेमप्लेट – धातूचा संबंध हा संपत्ती आणि नवीन धनाशी जोडला जातो, वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही तुमच्या घरात धातूची नेम प्लेट लावता, तेव्हा तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते, यासोबतच नवीन धन देखील तुमच्याघराकडे आकर्षित होते, त्यामुळे घरात धातूची नेमप्लेट लावणं हे अतिशय शुभ मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us