
नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, लवकरच नवीन वर्ष सुरू होत आहे, आता प्रत्येकाला नवीन वर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहेत. येणारं नवीन वर्ष हे आपल्याला सुखा, समाधानाचं जावं, आपली प्रगती व्हावी, नोकरीत प्रमोशन मिळावं, व्यवसायात नफा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. नवीन वर्ष चांगलं जावं यासाठी अनेक जण काही अध्यात्मिक आणि धार्मिक उपाय देखील करत असतात. वास्तुशास्त्रामध्ये देखील नवीन वर्षात तुमची प्रगती व्हावी, तुमची सर्व संकटातून मुक्तता व्हावी यासाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. अशा काही गोष्टी आहेत, ज्या नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरात आणणं शुभ मानलं गेलं आहे, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा – वास्तुशास्त्रानुसार आणि धर्माशास्त्रानुसार कुबेराला धनाची देवता मानलं गेलं आहे, ज्या व्यक्तीवर लक्ष्मी माता आणि कुबेर यांचा आशीर्वाद असतो, अशा व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कधीही धनाची कमी भासत नाही, त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी आपल्या घरामध्ये कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा आणावी, जर प्रतिमा आणली तर ती तुमच्या घराच्या उत्तर दिशेला असलेल्या भिंतीवर लावावी, कारण उत्तर दिशा ही कुबेराची आवडती दिशा आहे. तसेच जर तुम्ही कुबेराची मूर्ती आणणार असाल तर ती मूर्ती तुमच्या देवघरात ठेवावी, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
चांदीचं पात्र – नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरात एक चांदीचं पात्र आणा, त्यामध्ये तांदूळ भरून घराच्या उत्तर दिशेला ठेवून द्या, या उपायामुळे तुमच्या धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
मनी प्लँट- मनी लँटच्या रोपाला वास्तुशास्त्र आणि फेंगशुई दोन्हीनुसार खूप शुभ मानलं गेलं आहे, मनी प्लँटच्या रोपामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होतात.
सोने-किंवा चांदीचा दागिना- वास्तुशास्त्रानुसार शक्य असल्यास नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एखादा, सोने, किंवा चांदीचा दागिना खरेदी करावा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)