Vastu Shastra : नोकरी, व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगती होत नाहीये? मग करा हे सोपे उपाय
वास्तुशास्त्र हे असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? यासोबतच तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतात, अचानक संकट निर्माण होतात त्यावर देखील उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा आपण खूप प्रयत्न करतो मात्र आपल्याला आपल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळत नाही, अशा वेळी काय करायचं ते जाणून घेऊयात.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल किंवा काही त्रुटी राहिल्या असतील तर घरात वास्तुदोष निर्माण होतो, वास्तुदोषामुळे अकस्मात अनेक संकटं निर्माण होतात, जसं की कोणतंही कारण नसताना दररोज भांडणं होणं, घरात पैसा न टिकणं, कर्ज वाढणं या सारख्या समस्या निर्माण होतात, या समस्या दूर करण्याचे उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. अनेकदा असं देखील होतं की आपण आपल्या नोकरीमध्ये किंवा व्यावसायामध्ये प्रचंड मेहनत करतो, मात्र आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. अशावेळी नेमकं काय करावं? यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात काही कारणांमुळे वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा या प्रकारच्या अडचणी येतात. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय तुम्ही तुमच्या घराची तसेच कार्यस्थळाची पश्चिम दिशा ही स्वच्छ ठेवली पाहिजे. या दिशेला कोणंतही सामान किंवा अडचण असता कामा नये, वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा ही इच्छा पूर्ण करणारी दिशा असते, त्यामुळे पश्चिम दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे, या दिशेला कधीही भंगार किंवा खराब झालेल्या वस्तू ठेवू नये, तसेच पश्चिम दिशेचा संबंध हा शनिदेवांशी देखील आहे, जर तुमच्या घराची आणि कार्यालयाची पश्चिम दिशा स्वच्छ असेल तर शनि देवाचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळतो आणि शनि दोष देखील दूर होतो.
एवढंच नाही तर वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेच्या भिंतीला कधीच लाल किंवा हिरवा रंग देऊ नये. तसेच पश्चिम दिशेला कोणत्याही प्रकारची तांबे आणि स्टीलची उपकरणे ठेवू नये, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. जर पश्चिम दिशेच्या भिंतीला लाल किंवा हिरवा रंग दिलेला असेल तर तुम्हाला तुमच्या व्यावसायामध्ये नुकसान होण्याची शक्यता अधिक असते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. शक्यतो पश्चिम दिशेच्या भिंतीला पिवळा किंवा निळा कलर देणं हे शुभ मानलं जातं. तसेच पश्चिम दिशेला तुमचं स्वयंपाक घर असणं देखील वास्तुशास्त्रानुसार शुभ आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
