Vastu Tips : रात्रीच्या वेळी या तीन वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका; तर गरिबी आलीच म्हणून समजा

वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या सायंकाळनंतर दुसऱ्याला उसणं देणं टाळलं पाहिजे, कारण या गोष्टींचा संबंध थेट पैशांशी असतो.

Vastu Tips : रात्रीच्या वेळी या तीन वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका; तर गरिबी आलीच म्हणून समजा
| Updated on: Jul 11, 2025 | 1:15 PM

हिंदू धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या वास्तू अर्थात घराशी संबंधित अनेक गोष्टींचं मार्गदर्शन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी याबाबत सांगण्यात आलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमचं घर हे वास्तुशास्त्रानुसार नसेल किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू ठेवता त्याची दिशा ही वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, अकस्मात मोठी धन हानी किंवा नुकसान होण्याची देखील शक्यता असते.

वास्तुशास्त्रात केवळ तुमचं घर कसं असावं याबाबतच मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये, तर जर तुमच्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील, वाद विवाद असतील, सारखे भांडणं होत असतील तर त्यावर देखील वस्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या सायंकाळनंतर दुसऱ्याला उसणं देणं टाळलं पाहिजे, कारण या गोष्टींचा संबंध थेट पैशांशी असतो. त्यामुळे अशा गोष्टी जर तुम्ही सायंकाळच्या वेळी किंवा रात्री इतरांना दिल्या तर तुमच्यावर लक्ष्मी माता नाराज होते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत, याबद्दल आज आपण माहिती घेणार आहेत.

दही –  वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी चुकूनही इतरांना दही देता कामा नये, कारण यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होते, घरात गरीबी येऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी दही कोणालाही उसणे देऊ नये असं मानतात.

कात – काताचा उपयोग हा पानामध्ये होतो, मात्र कात देखील संध्याकाळच्या वेळी इतरांना देणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घरात गरिबी येते असं वास्तुशास्त्र सांगतं.

मीठ – मीठ ही देखील एक अशी वस्तू आहे, की जी रात्र झाल्यानंतर चुकूनही कोणाला उसणी देऊ नका, असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्रानुसार या तीन गोष्टी मीठ, कात आणि दही रात्र झाल्यानंतर कोणालाही उसण्या देऊ नयेत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)