
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? तुमच्या वास्तुची रचना कशी असावी? घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा? घराचा दरवाजा कोणत्या दिशेला नसावा? स्वंयपाक घर कोणत्या दिशेला असावं? बेडरूम कशी असावी अशा एकना अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
मात्र वास्तुशास्त्र केवळ तुमच्या घराच्या रचनेपुरतचं मर्यादीत नाहीये, तर वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक लाहन, मोठ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचा संबंध हा त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीशी येत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या घरामध्ये काय असावं? काय असू नये? घरात कोणत्या मूर्ती असणं शुभ आहे, कोणत्या मूर्ती अशुभ आहेत, घड्याळाची दिशा कोणती असावी, तुमच्या घरात जर देवी देवतांच्या प्रतिमा असतील तर त्या कोणत्या दिशेला असाव्यात अशा अनेक गोष्टींबाबत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
दरम्यान वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या तुमच्या घरात असणं अशुभ मानलं जातं, जर तुमच्याही घरात या वस्तू असतील तर त्या वस्तू घराच्या बाहेर काढा असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत? आणि वास्तुशास्त्रात नेमकं काय म्हटलं आहे? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
जुने कपडे – वास्तुशास्त्रानुसार घरात जुने आणि फाटलेले कपडे असता कामा नये, यामुळे तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये बाधा येऊ शकते.
जुनं भंगार सामान – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जुनं आणि भंगार सामान ठेवू नका, ते एक नकारात्मक ऊर्जेच प्रतिक आहे, यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
कचरा – जर तुमच्याही घरात वारंवार कचरा साचून राहात असेल तर हे अशुभ मानलं जातं, कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.
खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू – जर तुमच्याही घरात खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्याला घरात ठेवता कामा नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
बंद घड्याळ – वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळ हे वाईट वेळेचं प्रतिक असतं, त्यामुळे घरात असं बंद घड्याळ ठेवू नये.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)