
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे शुभ, अशुभ विचार सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्राला हिंदूधर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. या अडचणी कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर आरोग्याबाबतच्या समस्या, घरात कलह, पती-पत्नीमध्ये भाडणं, आर्थिक नुकसान असं अनेक प्रकारे तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अनेक जण नवं घर घेताना ते वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आहे का? हे पाहूनच घराची खरेदी करतात.
वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं याबाबतच मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये? तर कोणत्या गोष्टी शुभ आहेत? कोणत्या गोष्टी अशुभ आहेत याबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. घरात कोणत्या वस्तू ठेवणं शुभ आहे, घरात कोणत्या वस्तू ठेवू नये? याबाबत देखील वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू ठेवता त्यांची दिशा कोणती असावी? हे देखील वास्तुशास्त्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.
तुम्ही ऑफिसला जाता तेव्हा सोबत बॅग देखील घेऊ जाता, वास्तुशास्त्रानुसार या बॅगेचा संबंध देखील तुमच्या करिअरशी असतो. वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू आहेत, ज्या ऑफिसच्या बॅगेत न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
मेकपचं सामान आणि ज्वलेरी – मेकप आणि ज्वलेरी या दोन गोष्टींचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो आणि ऑफिसचा संबंध हा बुध व मंगळ ग्रहासोबत जोडला जातो, त्यामुळे या गोष्टी ऑफीस बँगेत ठेवू नका असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.
खराब झालले कपडे – तुम्ही जर ऑफिसच्या बँगमध्ये खराब कपडे ठेवत असाल तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं वास्तुशास्त्र सांगतं.
चाकू, नेलकटर – ऑफिसच्या बॅगमध्ये कधीही चाकू किंवा इतर धारदार वस्तू ठेवू नका असं वास्तुशास्त्र सांगतं.
परफ्यूम – वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या बॅगमध्ये परफ्यूम देखील ठेवता कामा नाही, यामुळे तुमचं मन विचलित होण्याची शक्यता असते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)