Vastu Tips : घरात वास्तुदोष तर नाही ना? ‘या’ संकेतांवरून ओळखा, जाणून घ्या दूर करण्याचे सोपे उपाय
Signs of Vastu Dosh: घरात वास्तुदोष असल्यास त्याचा परिणाम घरातील सुख-शांती, आर्थिक स्थिती आणि कुटुंबातील नात्यांवर होऊ शकतो, असं मानलं जातं. घरात वास्तु दोष आहे की नाही, हे काही संकेतांवरून ओळखता येतं. जाणून घ्या वास्तुदोषाची लक्षणं आणि ते दूर करण्यासाठी काही सोपे उपाय.

घरात सुख-शांती आणि सकारात्मक वातावरण असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, काही घरांमध्ये सतत वादविवाद होतात, आर्थिक अडचणी निर्माण होतात किंवा महत्त्वाची कामं वारंवार रखडतात. वास्तुशास्त्रानुसार, अशा काही गोष्टी घरातील वास्तुदोषाचे संकेत मानल्या जातात. घरात वास्तुदोष असल्यास त्याचा परिणाम कुटुंबातील सुख-शांती आणि आर्थिक स्थितीवर होतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे घरात वास्तुदोष आहे की नाही, हे काही लक्षणांवरून ओळखता येतं. जाणून घेऊया वास्तुदोषाचे संकेत आणि ते दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात सांगितलेले सोपे उपाय.
घरात सतत भांडणं होणं
वास्तुशास्त्रानुसार, घरातील सदस्यांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वारंवार वाद होत असतील, तर हे वास्तुदोषाचं लक्षण मानलं जातं. अशा घरात सतत तणावाचं वातावरण असतं. कुटुंबातील सदस्यांना मानसिक शांतता मिळत नाही आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.
घरात पैसा न टिकणं
चांगली कमाई असूनही घरात पैसा टिकत नसेल किंवा अनावश्यक खर्च सतत वाढत असेल, तर वास्तुशास्त्रानुसार हे वास्तुदोषाचं लक्षण मानलं जातं. अशा परिस्थितीत बचत करणं कठीण होतं आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात. वास्तुशास्त्रात याचा संबंध घरातील काही दिशांच्या दोषांशी जोडला जातो.
घरातील झाडं वारंवार सुकणं
घरात लावलेली हिरवीगार झाडं योग्य काळजी घेऊनही वारंवार सुकत असतील, तर वास्तुशास्त्रानुसार हा नकारात्मक ऊर्जेचा संकेत मानला जातो. काही धार्मिक मान्यतांनुसार, घरातील वास्तुदोषामुळे असं घडू शकतं.
महत्त्वाची कामं वारंवार बिघडणं
एखादं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना अचानक अडथळे येणं किंवा ठरलेली कामं वारंवार रखडणं, हेही वास्तुशास्त्रात वास्तुदोषाचं लक्षण मानलं जातं. अशा गोष्टी सतत घडत असतील, तर त्याकडे लक्ष देण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो.
घरातील सदस्य वारंवार आजारी पडणं
वास्तुशास्त्रानुसार, घरातील सदस्य एका मागोमाग एक आजारी पडत असतील किंवा सतत डॉक्टरांकडे जावं लागत असेल, तर यालाही वास्तुदोषाशी जोडलं जातं. घरातील काही गोष्टी योग्य दिशेला नसल्यामुळे अशा समस्या निर्माण होतात, अशी मान्यता आहे.
वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत?
वास्तुशास्त्रानुसार, घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. या उपायांमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं, अशी धार्मिक मान्यता आहे.
– घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि त्यावर तोरण लावावं.
– मुख्य प्रवेशद्वाराजवळ सैंधव मिठाच्या पाण्याने स्वच्छता करावी.
– संध्याकाळी घरात कापूर जाळून धूप दाखवावा.
– घराची ईशान्य दिशा म्हणजेच उत्तर-पूर्व दिशा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवावी.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)