Vastu tips: वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारे लावा देवघरात दिवा; देवघराबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते?

| Updated on: Jun 27, 2022 | 10:35 AM

प्रत्येकाच्याच घरात एक श्रद्धास्थान असते ज्याला आपण देवघर (Devghar) म्हणतो. वास्तुशास्त्रात (Vastushastra) देवघराला अत्यंत महत्त्व आहे. याशिवाय वास्तुशास्त्रात आपलं घर आणि त्याच्यातील वस्तुंबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात (Vastu tips). त्याचं जर आपण पालन केलं तर, आपल्या घरी सुख, शांती आणि आनंद नांदतो. अर्थातच हा प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे. ज्या लोकांनी याचा अनुभव घेतला आहे, त्यांना […]

Vastu tips: वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारे लावा देवघरात दिवा; देवघराबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते?
Follow us on

प्रत्येकाच्याच घरात एक श्रद्धास्थान असते ज्याला आपण देवघर (Devghar) म्हणतो. वास्तुशास्त्रात (Vastushastra) देवघराला अत्यंत महत्त्व आहे. याशिवाय वास्तुशास्त्रात आपलं घर आणि त्याच्यातील वस्तुंबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात (Vastu tips). त्याचं जर आपण पालन केलं तर, आपल्या घरी सुख, शांती आणि आनंद नांदतो. अर्थातच हा प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे. ज्या लोकांनी याचा अनुभव घेतला आहे, त्यांना याचं महत्व माहित आहे. अनेक नियम किंवा परंपरा जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे वारसा रूपाने हस्तांतरित होतात. अनेकदा या मागचं कारण आपल्याला माहिती नसते. घरातील देवघराबद्दलही बरेच नियम आहेत, देवघराची स्थापना कोणत्या दिशेला आणि कशी करावी, देवाची मूर्ती कोणती असावी आणि ती कुठे ठेवावी, या सर्वांवर वास्तूशास्त्रात सखोल माहिती दिली आहे.

घर लहान असो किंवा मोठं प्रत्येकाच्याच घरी देवघर असतं, प्रत्येकाच्या श्रद्धेचं ते स्थान असतं.वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. याबद्दल वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल, तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा. त्याचबरोबर तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार जर घरातील देवघरात शिवलिंग ठेवले जात असेल, तर भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मूर्तीही ठेवाव्यात. मृत पूर्वजांचे फोटो देवघरात किंवा पूजाघरात लावणे शुभ मानले जात नाही. देवघर बेडरूममध्ये न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला  गेला आहे. जर देवघरात शंख ठेवला असेल तर तो कधीही जमिनीवर ठेवू नये. असे मानले जाते की, ज्या देवघरात शंख आहे तिथे लक्ष्मी देवी स्वतः वास करते. तसेच पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर  ठेवण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

देवघराचे तोंड हे पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते. तसेच देवघराला लागून संडास किंवा बाथरूमची भीत नसावी. देवघर कायम स्वच्छ असावे. धूळ आणि जाळे दिसताच क्षणी स्वच्छ करावे.  तसेच देवघरात विनाकारण पसारा ठेऊ नये.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)