Vastu Tips: तुम्हीही घरावर लावत असाल शुभ-लाभ तर हे नक्की वाचा

घरात सुख आणि समृद्धी (prosperity) राहावी यासाठी अनेक जण विविध गोष्टी करत असतात. घराच्या दारावर एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते ती म्हणजे शुभ-लाभ (Subha Labh) हे शब्द. घराच्या दारावर शुभ-लाभ लावल्याने नक्की काय होता आणि या शब्दांचा नेमका अर्थ काय हे आज आपण जाणून घेऊ यात. अनेक जण शुभ संकेत किंवा सुख समृद्धी घरात राहावी […]

Vastu Tips: तुम्हीही घरावर लावत असाल शुभ-लाभ तर हे नक्की वाचा
नितीश गाडगे

|

Jun 25, 2022 | 9:31 AM

घरात सुख आणि समृद्धी (prosperity) राहावी यासाठी अनेक जण विविध गोष्टी करत असतात. घराच्या दारावर एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते ती म्हणजे शुभ-लाभ (Subha Labh) हे शब्द. घराच्या दारावर शुभ-लाभ लावल्याने नक्की काय होता आणि या शब्दांचा नेमका अर्थ काय हे आज आपण जाणून घेऊ यात. अनेक जण शुभ संकेत किंवा सुख समृद्धी घरात राहावी म्हणून शुभ-लाभ लावतात. शुभ-लाभ सोबत दारावर अनेकदा स्वस्तिकही पाहायला मिळते. शुभ-लाभ सोबत स्वस्तिक (Swastik) लावावे का किंवा काय आहे शुभ-लाभ लावण्याची योग्य पद्धत ते समजून घेणे आवश्यक आहे. आपण आपल्या घराच्या दारावर सभोवतालच्या भिंतीवर शुभ आणि लाभ असे लिहितो. हे का लिहितो आणि याचा गणपतीशी काय संबंध, चला तर मग जाणून घेऊ.

श्रीगणेशाचे दोन मुले शुभ आणि लाभ

महादेवाचे पुत्र गणेश याचे लग्न प्रजापती विश्वकर्मा यांच्या दोन्ही मुली रिद्धी आणि सिद्धी यांच्याशी झाले. सिद्धीपासून शुभ किंवा क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे असे दोन मुले झाले. लोक परंपरेत यांनाच शुभ आणि लाभ म्हणतात. गणेशपुराणानुसार शुभ आणि लाभाला केशं आणि लाभ या नावाने देखील ओळखले जाते. सिद्धी शब्दाचा अर्थ आहे ‘बुद्धी’ ज्याला हिंदी भाषेत शुभ असे म्हणतात. त्याच प्रमाणे सिद्धी शब्दाचा अर्थ ‘आध्यात्मिक शक्तीची पूर्णता’ म्हणजे ‘लाभ’ असा आहे.

शुभ आणि लाभाची मुले शास्त्रांमध्ये तुष्टी आणि पुष्टीला गणपतीच्या स्नुषा म्हटले आहे. श्री गणेशाचे नातवंड आमोद आणि प्रमोद आहेत. मान्यतेनुसार गणपतीची एक संतोषी नावाची मुलगी देखील होती. संतोषी मातेच्या वैभवाबद्दल आपल्या सर्वांना तर माहितीच असणार. शुक्रवार तिचा दिवस आहे आणि या दिवशी उपवास करतात.

जेव्हा आपण एखादा मुहूर्त बघतो तेव्हा अमृत व्यतिरिक्त शुभ आणि लाभ महत्त्वपूर्ण मानले जाते. दारावर श्री गणेशाच्या मुलांची नावे आपण स्वस्तिकाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस लिहितो. घराच्या मुख्यदारावर ‘स्वस्तिक’ मुख्यदाराच्या मध्यभागी आणि शुभ लाभ डाव्या उजव्या बाजूस लिहितात. स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा गणपतींच्या दोन्ही पत्नी रिद्धी आणि सिद्धीला दर्शवितात. घराच्या बाहेर शुभ-लाभ लिहिण्याचा अर्थ असा आहे की आमच्या घरात सुख आणि समृद्धी कायम राहो. लाभ लिहिण्यामागील भावना अशी आहे की आम्ही देवाला प्रार्थना करतो की आमच्या घरात उत्पन्न आणि संपत्ती वाढतच राहो, त्याचा आम्हाला फायदा मिळत राहो.

घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक, शुभ आणि लाभ या शक्तींचे प्रतीक आहे. गणेश (बुद्धी) + रिद्धि  (ज्ञान) = शुभ गणेश (बुद्धी) + सिद्धी  (आध्यात्मिक स्वातंत्र्य) = लाभ

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें