Vastu Tips: सतत भासत असेल पैशांची चणचण तर अवश्य करा हे वास्तू उपाय

| Updated on: Jan 05, 2023 | 3:12 PM

वास्तुदोषांमुळे व्यक्तीला इच्छा असूनही संपत्ती जमवता येत नाही. अशा परिस्थितीत कोणत्या कारणांमुळे घरात पैसा थांबत नाही आणि ते दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया.

Vastu Tips: सतत भासत असेल पैशांची चणचण तर अवश्य करा हे वास्तू उपाय
वास्तू दोष
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, अनेकांची तक्रार असते की, ते खूप कष्ट करून पैसे कमावतात, परंतु हा पैसा त्यांच्याकडे जास्त काळ टिकत नाही. घरात पैसा येतो आणि जातो. म्हणजेच पैसा भरपूर येतो, पण तितक्याच लवकर तो खर्चही होतो. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल आणि खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल, तर त्याचे एक कारण वास्तुदोष  असू शकते. वास्तुशास्त्राच्या (Vastu Tips) जाणकारांचे मत आहे की, आपल्या घरात असे काही वास्तुदोष असतात, ज्यामुळे घरात पैसा टिकत नाही. वास्तुदोषांमुळे व्यक्तीला इच्छा असूनही संपत्ती जमवता येत नाही. अशा परिस्थितीत कोणत्या कारणांमुळे घरात पैसा थांबत नाही आणि ते दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया.

या दिशेने सुरक्षित ठेवा

वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेला कुबेराचे निवासस्थान मानले जाते, त्यामुळे तिजोरी उत्तर दिशेला ठेवण्यासाठी खोली असणे उत्तम मानले जाते. याशिवाय कपाटात पैसे ठेवल्यास मधल्या किंवा वरच्या भागात ठेवा. खालच्या भागात ठेवू नका.

या गोष्टी तिजोरीत बसवा

वास्तूनुसार व्यापार वृद्धी यंत्र, महालक्ष्मी यंत्र, बिसा यंत्र यांसारखे शुभ यंत्र तिजोरीत ठेवणे शुभ असते. यामुळे घराची तिजोरी कधीच रिकामी होत नाही.

हे सुद्धा वाचा

लक्ष्मी आणि कुबेर यांच्या मूर्तीची स्थापना करा

लाख प्रयत्न करूनही घरात पैसा थांबत नसेल, तर धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांची मूर्ती देवघरात स्थापित करा. तसेच त्यांची नित्य पूजा करावी. हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

उष्टी भांडी ठेवू नका

बरेचदा लोकं रात्रीच्या जेवणानंतर खरकटी भांडी स्वयंपाकघरात ठेवतात आणि सकाळी उठून ती साफ करतात. वास्तूनुसार असे करणे अशुभ मानले जाते. ज्या घरांमध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जातात त्या घरांमध्ये माता लक्ष्मी कधीही राहत नाही. म्हणूनच तुम्ही रात्री भांडी धुवा अथवा बहेर ठेवा.

घर नेहमी स्वच्छ ठेवा

असे म्हणतात की ज्या घरात घाण असते, तिथे लक्ष्मीचा वास कधीच राहत नाही. म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. तसेच घराच्या पूर्व-उत्तर दिशेला कचरा कधीही ठेवू नये.

देवघरात शंख ठेवा

जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर दक्षिणावर्ती शंख पूजागृहात ठेवा. तसेच नियमित पूजा करताना शंख वाजवा. असे केल्याने घरात लक्ष्मी देवी वास करते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)