Vastu Tips: घराच्या ‘या’ दिशेला लावा कुबेराचे आवडते झाड, जुळून येइल धनलाभाचा याेग

असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती चांगली असेल तर त्याला जीवनात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.

Vastu Tips: घराच्या या दिशेला लावा कुबेराचे आवडते झाड, जुळून येइल धनलाभाचा याेग
वास्तू नियम
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 20, 2022 | 2:36 PM

मुंबई, वास्तुशास्त्रात (Vastu Tips) अशा अनेक वनस्पती सांगितल्या आहेत, त्यांना घरात लावल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा हाेते. मनी प्लांट, तुळशीचे रोप, शमीचे रोप अशी काही झाडे आहेत, जी घरात लावल्याने आणि त्यांची योग्य काळजी घेतल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. पण आज आपण कुबेर देव यांच्या आवडत्या वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत. कुबेर देवाची आवडती वनस्पती क्रॅसुला घराच्या (Crassula Plant) योग्य दिशेला लावल्यास याचे चमत्कारीक फायदे मिळतात.

वास्तू तज्ञांच्या मते क्रॅसुला वनस्पती मनी प्लांटपेक्षा अधिक चमत्कारी आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारते. या रोपाची विशेष गोष्ट म्हणजे हे रोप लावण्यासाठी तुम्हाला कोणत्याही खास जागेची गरज भासणार नाही. क्रॅसुला वनस्पतीशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

शुक्र बळकट करते क्रॅसुला

क्रॅसुला ही वनस्पती शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती चांगली असेल तर त्याला जीवनात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. तसेच, व्यक्तीला सर्व भौतिक सुखसोयी मिळतात. कुबरे देव यांना ही वनस्पती अतिशय प्रिय आहे.  म्हणूनच ही वनस्पती घरात लावल्याने व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती बळकट हाेते.  मात्र त्यासाठी ते योग्य दिशेने ठेवणे आवश्यक आहे.

कुठे लावायची क्रॅसुला वनस्पती

  1.  जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल किंवा घरात पैशाची कमतरता असेल तर घराच्या उत्तर दिशेला लावल्यास विशेष फायदा होईल. लागवड करताना रोप अंधारात राहू नये याची विशेष काळजी घ्यावी. तसेच त्याची पाने नेहमी स्वच्छ ठेवावीत.
  2. दुसरीकडे, जर तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती हवी असेल तर घराच्या नैऋत्य दिशेला हे रोप लावा. याशिवाय हे झाड ऑफिसच्या डेस्कवरही ठेवता येतो. यामुळे व्यक्तीच्या पदोन्नतीची शक्यता बळकट होते.
  3. व्यवसायिकांनी हे लक्षात ठेवावे की ही वनस्पती कॅश काउंटरच्या वर ठेवल्यास शुभ फळ मिळते. कुबेर देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल आणि व्यवसायात भरपूर नफा मिळेल.
  4. घरामध्ये सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी घराच्या बाल्कनीमध्ये हे रोप लावण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हणतात की, या वनस्पतीला जितका जास्त सूर्यप्रकाश मिळेल तितकी ही वनस्पती अधिक परिणाम देते. आणि सुख-समृद्धी त्यांच्याच घरात राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)