AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : मुख्य दरवाजावर लावा ही एक वस्तू, घरावर पडले पैशांचा पाऊस, कर्जापासून झटक्यात सुटका

जर तुमच्याही आयुष्यात धनाशी संबंधित समस्या असतील तर वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमची ही समस्या दूर होऊ शकते. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्त्रोत असतो. तेथूनच दोन्ही प्रकारची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते.

Vastu Tips : मुख्य दरवाजावर लावा ही एक वस्तू, घरावर पडले पैशांचा पाऊस, कर्जापासून झटक्यात सुटका
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2025 | 6:53 PM
Share

जर तुमच्याही आयुष्यात धनाशी संबंधित समस्या असतील तर वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमची ही समस्या दूर होऊ शकते. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्त्रोत असतो. तेथूनच दोन्ही प्रकारची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते, नकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. धनहानी होऊ शकते, आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर ठेवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा घरात प्रवेश होण्यासाठी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

तांब्याचा सूर्य – वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर ताब्यांच्या सूर्याची प्रतिकृती लावणं शुभ मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घरातील पैशांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो, आणि घरातील वातावरण प्रसन्न राहातं, सोबतच आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात.

गणपतीची मूर्ती – घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीची मूर्ती लावणं वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हणतात. जर तुमच्या दरवाजावर गणपतीची मूर्ती असेल तर तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट हे दरवाजातूनच माघारी जातं. तुम्हाला आयुष्यात कधी पैशांची कमी भासत नाही.

शमीचं झाड – वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजा जवळ शमीचं झाडं लावणं देखील शुभ मानलं जातं. या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहातो आणि आयुष्यात कधी पैशांची कमी भासत नाहीत.

स्वस्तिकचं चिन्ह – हिंदू धर्माशास्त्रामध्ये स्वस्तिकच्या चिन्हाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वस्तिकचं चिन्ह शुभ मानलं जातं. घराच्या मुख्य दरवाजाला स्वस्तिकचं चिन्ह लावल्यास घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. घरावर येणारं प्रत्येक संकट दूर होतं, असं मानलं जातं.

या चुका करू नका

घराच्या मुख्य दरवाजा जवळ कधीच चप्पल, बूट सोडू नका, घराचा मुख्य दरवाजा जिथे आहे, तो भाग कधीच आंधारात ठेवू नका. घराच्या दरवाजावर बल्ब लावावा. तसेच घराच्या मुख्य दरवाजाजवळ कधीच कचऱ्याची बाधली ठेवू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!