
हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. विजया एकादशीच्या दिवशी विष्णू भगवानची पूजा केली जाते. प्रत्येकवर्षी महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला विजया एकादशीचे व्रत पाळले जाते. विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि व्रत केल्यामुळे तुमच्या कामामध्ये प्रगती होईल. तुमच्या कामाामध्ये अडथळे येत असतील आणि महत्त्वाच्या गोष्टी लांबणीवर जात असतील तर विजया एकादशीचे व्रत तुम्ही केले पाहिजेल. या दिवशी व्रत आणि पूजा केल्यामुळे तुमच्या विरोधींवर तुम्ही मात करू शकता. या व्रताच्या दिवशी फळाचे सेवन केल्यामुळे तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.
विजया एकादशीच्या दिवशी तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवा. असे केल्यामुळे तुम्हाला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या घरात आणि आयुष्यात सुख समृद्धी मिळते. पंचांगानुसार, विजया एकादशी तिथी 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:56 वाजता सुरू होईल आणि एकादशी तिथी 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:45 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, उदय तिथीनुसार, विजया एकादशाचे व्रत 24 तारखेलाच पाळले जाईल.
भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र – भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी त्यांची मूर्ती किंवा चित्र ठेवणे आवश्यक आहे.
पिवळी फुले – भगवान विष्णूंना पिवळी फुले आवडतात. म्हणून, पूजा थाळीत पिवळी फुले ठेवा.
फळे आणि मिठाई – पूजा झाल्यानंतर भगवान विष्णूला फळे आणि मिठाई अर्पण करा.
तुळशीची पाने – तुळशीची पाने भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत. म्हणून, पूजा थाळीत नेहमी तुळशीची पाने ठेवा.
दिवा आणि धूप – भगवान विष्णूच्या आरतीसाठी दिवा आणि धूप लावा.
पंचामृत – पंचामृत भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. म्हणून, पूजा थाळीत पंचामृत ठेवा.
धूप – भगवान विष्णूच्या आरतीसाठी धूप जाळा. यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
नारळ – विजया एकादशीच्या दिवशी नारळाला विशेष महत्त्व आहे. पूजा थाळीत नारळ ठेवणे शुभ मानले जाते.
विजया एकादशीच्या दिवशी योग्य विधींनी भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी मिळण्यास मदत होते ज्यामुळे तुमची प्रगती होते.
विजया एकादशीच्या दिवशी ‘या’ गोष्टी करा
विजया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर भगवान विष्णूसमोर मंत्र जप करा. भगवान विष्णूच्या मूर्तीला किंवा चित्राला गंगाजलाने स्नान घाला आणि त्यांना पिवळी फुले, तुळशीची पाने, फळे आणि मिठाई अर्पण करा दिवा आणि धूप लावा आणि आरती करा आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करा. या दिवशी निर्जल किंवा फळरहित उपवास पाळला जातो. जर ते शक्य नसेल तर दिवसातून एकदा सात्विक अन्न खाऊ शकतो. भगवान विष्णूंचे स्तोत्राचे रात्रभर पठण करा. द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान करा, पूजा करा आणि ब्राह्मणांना जेवण द्या. यानंतर, उपवास सोडा. विजया एकादशीच्या दिवशी कांदा, लसूण आणि मांस यासारखे तामसिक अन्न खाऊ नका. या दिवशी ब्रह्मचर्य पाळा आणि खोटे बोलू नका. तसेच, कोणालाही अपशब्द वापरू नका. विजया एकादशीचे व्रत श्रद्धेने आणि भक्तीने पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते.