Vijaya Ekadashi 2025: विजय एकादशीच्या दिवशी तुळशीला ‘या’ विशेष वस्तू अर्पण केल्यामुळे मिळेल पैसाच पैसा…..
Vijaya Ekadashi Tulsi Upay: हिंदू ग्रंथानुसार, विजया एकादशीच्या दिवशी तुळशीला काही खास वस्तू अर्पण केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचाही आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे बिघडलेली कामे पूर्ण होऊ लागतात. विजया एकादशीच्या दिवशी तुळशीला काय अर्पण करावे ते येथे जाणून घ्या.

हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. ग्रंथानुसार, विजया एकदशीच्या (Vijaya Ekadashi 2025) दिवशी तुळशीची विशेष पूजा केली जाते. विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा (Tulsi Pujan) केली जाते. या दिवशी तुळशीची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. या दिवशी तुळशीची पूजा केल्यामुळे तुमच्यावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. विजया एकादशीच्या दिवशी शांत मनानी विष्णू देवाची (Lord Vishnu) पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छ पूर्ण होण्यास मदत होते.विजया एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा (Tulsi Pujan) केल्यामुळे तुमच्या घरातील सुख शांती आणि समृद्धी टिकून राहाते. त्यासोबतच रातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण होते.
तुळश भगवान विष्णूला (Lord Vishnu) अत्यंत प्रिय मानली जाते. त्यामुळे विष्णू भगवानची पूजा करताना तुळशीची देखील पूजा केली जाते. विजया एकादशीच्या (Vijaya Ekadashi 2025) दिवशी पूजा तुळशीची केल्यामुळे विष्णू भगवानचा तुम्हाला आशिर्वाद मिळतो. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:55 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:44 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, उदयतिथीनुसार, विजया एकादशी (Vijaya Ekadashi 2025) 24 फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी केली जाईल.
- विजया एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा कशी करावी?
- विजया एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला.
- तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा आणि त्याच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करा.
- तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा.
- तुळशीच्या रोपाला सिंदूर, रोली आणि चंदनाचा टिळक लावा.
- तुळशीच्या रोपाला फळे, फुले आणि मिठाई अर्पण करा.
- तुळशी चालीसा किंवा तुळशी स्तोत्राचे पठण करा.
- भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करा.
विजया एकादशीच्या दिवशी तुळशीला या गोष्टी नक्की अर्पण करा….
- गंगाजल: विजया एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला गंगाजल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते.
- कच्चे दूध: तुळशीच्या झाडाला कच्चे दूध अर्पण केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात. यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि आर्थिक समस्या दूर होतात.
- सिंदूर: विजया एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला सिंदूर अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढते.
- तुपाचा दिवा: विजया एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.
- तुळशी मंत्र: विजया एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपासमोर बसून तुळशी मंत्राचा जप करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचाही आशीर्वाद मिळतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.
- मंत्र: “ओम तुलसीदेव्यै च विद्महे, विष्णुप्रियै च मंदता, तन्नो वृंदा प्रचोदयात्.” या मंत्राचा जप केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते.
