Vinayak Chaturthi 2022 | सर्व संकट दूर होतील आज विनायक चतुर्थी या गोष्टी करा, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त

| Updated on: Mar 06, 2022 | 1:35 PM

हिंदू (Hindu)धर्मात गणेशाला प्रथम पूजेचे स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश वंदनेने केली की ते कार्य कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होते अशी मान्यता आहे. प्रत्येक महिन्यात दोन्ही बाजूंची चतुर्थी तिथी गणपतीला (Vinayak Chaturthi 2022) समर्पित केली जाते.

Vinayak Chaturthi 2022 | सर्व संकट दूर होतील आज विनायक चतुर्थी या गोष्टी करा, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
Ganesha
Follow us on

मुंबई :  हिंदू (Hindu)धर्मात गणेशाला प्रथम पूजेचे स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश वंदनेने केली की ते कार्य कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होते अशी मान्यता आहे. प्रत्येक महिन्यात दोन्ही बाजूंची चतुर्थी तिथी गणपतीला (Vinayak Chaturthi 2022) समर्पित केली जाते. शुक्ल पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते.दर महिन्यात दोन चतुर्थी येतात. शुक्ल पक्षच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.तर  आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात (Vinayak Chaturthi 2021 Know The Puja Vidhi And Shubh Muhurt). या महिन्यात फाल्गुन मासातील शुक्ल पक्षाची चतुर्थी 6 मार्च, रविवारी साजरी करण्यात येत आहे. या दिवशी गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते. गणेशाची पूजा करताना नियमांचे योग्य प्रकारे पालन केल्यास त्या व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया विनायक चतुर्थीची शुभ वेळ आणि पूजेची पद्धत.

फाल्गुन महिना विनायकी चतुर्थी पूजा शुभ मुहूर्त (फाल्गुन महिना विनायक चतुर्थी पूजा शुभ मुहूर्त 2022)
फाल्गुन विनायक चतुर्थी दिनांक : 6 मार्च 2022
चतुर्थी दिनांक : 5 मार्च 2022 रात्री 08:35 ते
चतुर्थी तिथी समाप्ती : 6 मार्च तेरात्री 09:11 पर्यंत

महत्व काय?
हिंदू धर्मात सर्वात पहिली पूजा भगवान गणेशाची केली जाते. कुठल्याही शुभ कार्य करण्यापूर्वी पहिले गणेशजीची पूजा केली जाते. भगवान गणेशाला विघ्नहर्ता मानलं जातं. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात

विनायक चतुर्थी पूजन विधी 2022
विनायक चतुर्थीच्या शुभ दिवशी सकाळी स्नान करून लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. कारण हा रंग गणपतीला आवडतो. आता पूजेच्या ठिकाणी पिवळे किंवा लाल कापड लावून गणेशाची मूर्ती स्थापित करा. त्यानंतर त्यांना जलाभिषेक करून त्यांना सिंदूर लावून तिलक लावावा. आता त्यांना दुर्वा, फळे, फुले आणि मिठाई अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावून आरती करा.

विनायक चतुर्थीला या मंत्रांचा जप करा –

“ओम एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्”

“गजाननम् भूत गणादि सेवितम्, कपित् य जम्भु फलसरा ​​भिक्षितम्, उमसुतम् शोका विनशा करणम्, नमामि विघ्नहेश्वर पद पंकजम्”

“वक्रतुण्ड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:, निर्विघ्नम् कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा”

संबंधित बातम्या : 

Amalaki Ekadashi 2022 : अमलकी एकादशीच्या दिवशी पूजा करताना ही कथा वाचा, जाणून घ्या शुभ मुहूर्त!

शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेव का प्रसन्न होतात?, जाणून घ्या पौराणिक कथा!

Holashtak 2022 : 10 मार्चपासून सुरू होणार होळाष्टक, जाणून घ्या यात शुभ आणि अशुभ नेमके काय?