आर्थिक चणचण दूर करायची आहे? मग गुरुवारच्या दिवशी करा हे उपाय

गुरुवारच्या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे आर्थिक चणचण दूर होते. देवी लक्ष्मीची कृपा होते.

आर्थिक चणचण दूर करायची आहे? मग गुरुवारच्या दिवशी करा हे उपाय
भगवान विष्णू
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 16, 2022 | 10:26 PM

मुंबई,  गुरुवार हा भगवान विष्णूच्या (Bhagwan Vishnu) उपासनेसाठी समर्पित आहे. या दिवशी देव गुरु देखील बृहस्पतिची पूजा करतात. जेव्हा गुरू ग्रह बलवान असतो तेव्हा कामात प्रगती, कीर्ती, उन्नती होते. गुरुवारी काही सोपे उपाय (Guruwar Upay) करून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता. यामुळे आर्थिक चणचण दूर होण्यास मदत मिळते. जाणून घेऊया गुरवाच्या दिवशी कोणते उपाय केल्याने फायदा होतो.

  1.  गुरु ग्रहाला बळ देण्यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर देव गुरु बृहस्पतीची पूजा करा. त्यानंतर ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप किमान एक जपमाळ करावा. जपासाठी तुळशीची माळ वापरावी. या उपायाने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. धन आणि संपत्ती वाढेल.
  2.  गुरुवारी भगवान विष्णूसोबत धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीची पूजा करा. असे केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. त्याच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि आर्थिक संकट दूर होईल. लक्षात ठेवा की, देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका.
  3.  गुरुवारच्या दिवशी  पैसे उधार देऊ नयेत किंवा घेऊ नयेत अशी धार्मिक मान्यता आहे. असे केल्याने आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
  4.  भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पती यांचा आवडता रंग पिवळा आहे, त्यामुळे गुरुवारी पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करा आणि कपाळावर पिवळे तिलक लावा. भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
  5.  या दिवशी भगवान विष्णूला केळी अर्पण करा. पिवळी फुले, हरभरा डाळ, गूळ अर्पण करा. पंचामृत स्नान करून तुळशीचे पान अर्पण करावे. स्वतः केळी खाऊ नका. श्रीहरीच्या आशीर्वादाने सर्व अडचणी दूर होतील. सुख-समृद्धी वाढेल.
  6.  जर पती-पत्नीमध्ये वैवाहिक समस्या असतील तर दोघांनीही गुरुवारी व्रत करून भगवान विष्णू आणि बृहस्पती देव यांची एकत्र पूजा करावी. तुमच्या जीवनात आनंद आणि सौभाग्य वाढेल. समस्या दूर होतील.
  7. ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत आहे, त्यांनी नियमितपणे गुरुवारी व्रत करावे. गुरुवारी ब्राह्मणाला गूळ, हरभरा डाळ, हळद, पिवळे कपडे इत्यादी दान करा. बृहस्पति बलवान होताच विवाहाची बाब निश्चित होऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)