AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवान विष्णूचे ‘हे’ चार चमत्कारिक मंदिर; जिथे मागितलेल्या सर्व इच्छा होतात पूर्ण!

असे मानले जाते की, दररोज भगवान विष्णूच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि धन आणि वैभव प्राप्त होते.

भगवान विष्णूचे 'हे' चार चमत्कारिक मंदिर; जिथे मागितलेल्या सर्व इच्छा होतात पूर्ण!
| Updated on: Jun 04, 2022 | 3:37 PM
Share

भगवान विष्णू (Bhagwan Vishnu) ज्यांना जगाचा तारणहार म्हणून ओळखले जाते. ते कधी मरियदा पुरुषोत्तम रामाच्या रूपात तर कधी कृष्णाच्या (Shri Krisna) रूपात पापांच्या नाशासाठी अवतरले. भगवान विष्णूच्या मोहिमांचे वर्णन अनेक हिंदू पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये आढळते. शास्त्रानुसार गुरुवारी विष्णूजींची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते. कलयुगातही भगवान विष्णूंप्रती भक्तांमध्ये खूप श्रद्धा आहे. शास्त्रानुसार विष्णु मंत्राचा नियमित जप केल्यास ते खूप फलदायी ठरते. विशेषत: वैशाख, कार्तिक आणि श्रावणात विष्णूची उपासना अधिक फलदायी असते. असे मानले जाते की दररोज भगवान विष्णूच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि धन आणि वैभव प्राप्त होते. त्याचबरोबर भगवान विष्णूची अशी काही मंदिरे आहेत (miraculous temples of Lord Vishnu), जिथे केवळ दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळते.

भगवान विष्णूंचे प्रसिद्ध मंदिर

  1. रंगनाथ स्वामी मंदिर- तामिळनाडू (Ranganath swami Temple Tamilnadu) भगवान श्रीहरीचे हे भव्य मंदिर तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगम येथे कावेरी नदीच्या काठी वसलेले आहे. भगवान विष्णूचे रंगनाथ रूप आणि मंदिराची भव्यता पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे गोदावरी आणि कावेरी नद्यांच्यामध्ये बांधलेले आहे. पृथ्वीचे बैकुंठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पवित्र स्थानी कृष्ण दशमीच्या दिवशी कावेरी नदीत स्नान केल्यास आठ तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.
  2. बद्रीनाथ धाम- उत्तराखंड (Badrinath Dham Uttarakhand) हिंदू धर्माच्या चार धामांपैकी एक आणि जगातील आठवे बैकुंठ, बद्रीनाथ धाम हे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथे मंदिराच्या गर्भगृहात विष्णूसोबत नर नारायणाची मूर्तीही स्थापित आहे. बद्रीनाथचे दरवाजे उघडल्याची माहिती मिळताच येथे भाविकांची गर्दी झाली आहे. या मंदिराचे दरवाजे बंद करताना प्रज्वलित केलेली ज्योत दरवाजे उघडेपर्यंत तेवत राहते, असे म्हणतात. हा चमत्कार पाहण्यासाठी दूरवरून लोकं  येतात.
  3. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर- महाराष्ट्र (Vitthal Rukmini Temple Maharashtra) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे विठुरायाचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात आहे. हे मंदिर विठ्ठल आणि रुक्मिणी, भगवान विष्णूचे एक रूप आहे असे मानले जाते. या मंदिराजवळ भीमा नदी असून तिथल्या स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे.
  4. तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर- तिरुपती भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक, तिरुपती वेंकटेश्वर मंदिर तिरुपतीजवळील तिरुमला टेकडीवर वसलेले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भगवान व्यंकटेशाच्या दर्शनासाठी येतात. लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक असण्यासोबतच हे मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्य आणि शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे.

(वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.