
हिंदू धर्मामध्ये तुळशी पूजेचं विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची दररोज पूजा केली पाहिजे, तुळशीची दररोज पूजा केल्यानं आणि तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे तुमच्यावर सदैव माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा राहते. सोबतच घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात, वास्तुदोष दूर होतो. घरात शांती राहते, सूख समृद्धी येते. घरातील वातावरण आनंदी राहातं. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या माळेला पवित्र मानलं गेलं आहे, जो व्यक्ती तुळशीची माळ आपल्या गळ्यात घालतो, त्याला आयुष्यात कधीही कशाचीही चिंता राहत नाही, असं धर्मशास्त्र सांगतं. ज्याच्याकडे तुळशीची माळ असते, त्याला सैदव माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळतो. मात्र तुम्ही जर तुळशीची माळ गळ्यात घालण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी काही नियम आहेत, हे नियम आधी जाणून घेणं आवश्यक आहे. आज आपण त्याबद्दलच माहिती घेणार आहोत.
तुळशीच्या माळेचे फायदे
धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही जर तुळशीची माळ धारण केली तर तुम्हाला मनसिक शांती मिळते, भगवान विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी माता यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहतो. आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कधीही कमी भसत नाही. घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सकारात्मक ऊर्जेचं आगमन होतं. जीवनात सुख शांती येते, आर्थिक तंगीमधून सुटकारा मिळतो, असे अनेक फायदे धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत.
तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे नियम काय?
सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ज्या माणसानं गळ्यात तुळशीची माळ घातली आहे, त्याने कधीही त्याच्या आयुष्यात मांसहार केला नाही पाहिजे, तुळशीच्या माळेचं पावित्र्य जपलं पाहिजे. ज्या व्यक्तीनं तुळशी माळ आपल्या गळ्यात घातली आहे, त्या व्यक्तीनं सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. तसेच रविवारी आणि आमावस्याच्या दिवळी तुळशीची माळा घालू नये, असंही सांगण्यात आलं आहे. तुम्हाला जर पहिल्यांदा तुळशीची माळ गळ्यात घालायची असेल तर त्यासठी सोमवार, गुरुवार, बुधवार आणि एकादशी हे दिवस खूप शुभ मानले गेले आहेत.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)