
आपल्याला दररोजच्या आयुष्यात अनेकदा असे काहीना काही संकेत मिळत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला ते संकेत लक्षात येत नाही. पण जर हे संकेत लक्षात घेतले तर बऱ्याच गोष्टींची कल्पना आपल्याला मिळू शकते. विशेषत: भविष्यात होणाऱ्या आर्थिक लाभाबद्दलही आप्याला काही ना काही संकेत मिळतच असतात. ज्यावरून हे लक्षात येते की, लवकरच आर्थिक लाभ आपल्याला होणार आहेत. ते संकेत कोणते हे जाणून घेऊयात.
गाय भाकरी खाताना पाहणे
जर तुम्हाला सकाळी किंवा दिवसभरात गाय भाकरी खाताना दिसली तर ते खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, हे सूचित करते की जीवनातील सर्व दुःख दूर होतील आणि सुख आणि संपत्ती वाढू शकते. किंवा अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
घरात पोपट येणे
वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या घरात पोपटाचे आगमन शुभ मानले जाते. जर तुमच्या घरात पोपट आला तर ते आर्थिक समस्या दूर होण्याचे संकेत असतात. तसेच व्यवसायात यश देखील मिळण्याचे लक्षण असू शकतात.
स्वप्नात कमळाचे फूल पाहणे
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात कमळाचे फूल दिसणे शुभ मानले जाते. हे स्वप्न पाहिल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. जर तुम्हाला स्वप्नात कमळाचे फूल दिसले असेल तर समजून घ्या की तुम्हाला लवकरच आयुष्यात संपत्ती मिळू शकते आणि तुमचे अन्न आणि संपत्तीचे भांडार कधीही संपणार नाही.
घरात किंवा आसपासच्या परिसरात घुबड येणे
घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. म्हणूनच, घरात घुबडाचे आगमन शुभ मानले जाते. असे मानले जाते की घरात घुबडाचे आगमन आर्थिक समस्या दूर करते आणि आर्थिक लाभ मिळवून देते. घुबड हे संयम, बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. जर घरात अचानक घुबड आलं किंवा घराच्या आसपास सतत घुबड दिसत असेल तर नक्कीच ते देवी लक्ष्मी प्रसन्न असल्याचे संकेत आहेत.
शंखाचा आवाज ऐकू येणे
याशिवाय, जर तुम्हाला सकाळी शंखाचा आवाज ऐकू आला तर तो देखील एक शुभ संकेत मानला जातो. हा संकेत मिळाल्यावर समजून घ्या की तुमचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच देवीची आशीर्वादही तुमच्यावर आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)