कितीही कष्ट करा, पैसे कमवा, हातात पैसा टिकत नाही? मग हा सोपा उपाय कराच
वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टींवर उपाय सांगण्यात आले आहेत, जर तुमचा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होत असेल तर त्यासाठी काही खास उपाय आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात पैसा टिकून राहील, घरात बरकत येईल.

महागाई प्रचंड वाढली आहे, मिळणारं उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ साधताना आज प्रत्येकालाच तारेवरची कसरत करावी लागत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त वाढला आहे, कितीही कमवा हातात पैसा टिकत नाही, महिन्याच्या एक तारखेला पगार होतो आणि दहा तारखेपर्यंत सर्व पैसे खर्च होतात. त्यामुळे अनेक जण चिंतेत असतात. मात्र वास्तुशास्त्रामध्ये असे काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे घरात बरकत येते, पैसा टिकून राहतो, आणि कर्जातून तुमची सुटका होते, चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही सोप्या उपायांबद्दल.
महिन्याच्या एक तारखेला करा हे उपाय – जर तुमच्याही घरात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होत असेल तर महिन्याच्या एक तारखेला माता लक्ष्मीला एक रुपया अर्पण करा. लक्ष्मी मातेची पूजा झाल्यानंतर त्या रुपयाला तुमच्या घरातील पिठाच्या डब्यात ठेवून द्या.वास्तुशास्त्रानुसार हा उपाय केल्यास पैशांची बचत होते, घरात पैसा टिकून राहतो आणि अनावश्यक खर्च कमी होतात.
अनावश्यक खर्च टाळण्यासाठी उपाय – काहीही कारण नसताना अचानक तुमच्याकडे आलेला पैसा खर्च होतो, तर त्यासाठी देखील वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. तुमच्या पाकिटामध्ये सात लवंगा ठेवा, लवंगाला शनि देव आणि मंगळ ग्रहाला शांत करण्याचं प्रतिक मानलं गेलं आहे. लवंगा नकारात्मक ऊर्जा दूर करतात, आणि पैशांची बचत होते. लक्षात ठेवा या लवंगा दर महिन्याला बदल राहा.
अचानक धनलाभासाठी उपाय – अचानक धनलाभ होण्यासाठी दर शुक्रवारी दुर्गा मातेची पूजा करा, यामुळे तुमच्यावर दुर्गा मातेचा आशीर्वाद राहील आणि अचानक धन प्राप्तीचे योग देखील येतील, असं वास्तुशास्त्र सांगतं.
अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी – जर तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीकडे अडकले असतील आणि ते तुम्हाला परत मिळत नसतील तर अशा परिस्थितीमध्ये दररोज सूर्यदेवाला अर्ध्य द्या, यामुळे तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. या सोबतच घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी त्यामुळे धनलाभ होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
