अन्नात केस निघणे कशाचे संकेत असतात? आयुष्यात होणार असतात ‘हे’ बदल

कधी कधी जेवणाताना ताटात किंवाअन्नात केस निघतो. त्यावेळी काहीजण याला अगदीच सामान्य समजतात तर काहींच्या मते त्याचे बरेच अर्थ निघतात. ताटात किंवा अन्नात केस निघणे हे बऱ्याच गोष्टींचे संकेत असतात असं म्हटलं जातं. जाणून घेऊयात याचा नेमका अर्थ काय असतो.

अन्नात केस निघणे कशाचे संकेत असतात? आयुष्यात होणार असतात हे बदल
What is a sign of hair in food
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 06, 2025 | 2:48 PM

शास्त्रांमध्ये या अन्नाला देवासारखेच पूजनीय मानले गेले आहे. अन्न हे पूर्णब्रह्म मानलं जातं. म्हणूनच जेवताना आणि अन्न तयार करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आपले अन्न जीवनात घडणाऱ्या घटनांचे संकेत देखील देतात. हे संकेत समजून घेणे महत्वाचे आहे. त्यातील एक म्हणजे जेवताना ताटात किंवा अन्नात केस सापडणे. जेवताना किंवा काहीही खाताना अन्नात किंवा ताटात केस निघतो. काही जणांसाठी ते अगदीच सामान्य असतं पण काही जणांसाठी त्याचे बरेच अर्थ निघतात. जाणून घेऊयात की त्याचा अर्थ नेमका काय होतो ते.

राहूचा प्रभाव वाढतो….

जेवणात कधीकधी केस दिसणे सामान्य आहे. परंतु जर अन्नात वारंवार केस आढळले तर ते शुभ नाही. अशा परिस्थितीत, असे मानले जाते की राहूचा प्रभाव तुमच्या जीवनावर किंवा घरावर वाढत आहे. अन्नात वारंवार केस येणे हे वाईट लक्षण मानले जाते. यामुळे व्यक्तीचे आर्थिक नुकसान होते. आर्थिक प्रगतीत अडथळा येतो. त्यामुळे अनावश्यक नुकसान होते असे मानले जाते. राहूची अशी परिस्थिती व्यक्तीच्या हातात पैसा राहू देत नाही असे मानले जाते.

शास्त्रांमध्ये असे मानले जाते की जर तुम्ही जेवायला बसलात आणि तुमच्या ताटात केस दिसला किंवा जेवणाच्या पहिल्या घासाला केस निघाला तर हे देखील पितृदोषाचे लक्षण मानले जाते. सामान्यतः, ज्या घरांमध्ये किंवा कुंडलींमध्ये पितृदोष असतो, तिथे अन्न शिजवण्यात किंवा खाण्यात  अडथळा येतो असं म्हटलं जातं.

अन्नात केस आढळल्यास काय करावे?

घरातील वडीलधाऱ्यांनी अन्न शिजवताना केस बांधून अन्न शिजवण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून केस अन्नात पडू नयेत. कारण केस पोटात जाणे हे आरोग्यासाठी चांगले नसते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की यामुळे आरोग्यासोबतच तुमच्या जीवनात वाईट परिणाम वाढतात. म्हणून हे टाळण्यासाठी, जेव्हा अन्नात केस आढळतात तेव्हा ते अन्न खाऊ नका. ते फेकून देऊ नका, तर ते पक्षी किंवा प्राण्याला खायला द्या.

असे दिसून आले आहे की जेव्हा आपण एखाद्याला अन्न वाढतो तेव्हा बऱ्याचदा आपल्या हातातून अन्न खाली पडते . हे अधूनमधून घडले तरी ठीक आहे, परंतु जर हे वारंवार घडले तर ते चांगले लक्षण मानले जात नाही. भविष्यात घरात गरिबी पसरणार आहे याचे हे लक्षण असते असं म्हटलं जातं.

 

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)