Jaya Ekadashi 2022 | जया एकादशी म्हणजे काय ? जाणून घ्या तिथी, पूजा मुहूर्त आणि आख्यायिका

| Updated on: Feb 03, 2022 | 8:58 AM

Jaya Ekadashi 2022 भक्त पूर्ण भक्ती आणि भक्तीभावाने जया एकादशीचे व्रत पाळतात, तर चला जाणून घेऊया फेब्रुवारीच्या कोणत्या तारखेला जया एकादशीचा उपवास केला जाईल.

Jaya Ekadashi 2022 | जया एकादशी म्हणजे काय ? जाणून घ्या तिथी, पूजा मुहूर्त आणि आख्यायिका
Jaya-Ekadashi-2021
Follow us on

मुंबई :  माघ (Magh) महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी साजरी केली जाते, त्या एकादशीला जया एकादशी (Jaya Ekadashi 2022) म्हणतात. जया एकादशीला व्रत आणि पूजेला विशेष महत्त्व आहे. जया एकादशीला भक्त विशेषत: भगवान विष्णू आणि श्री कृष्णाची (Shree Krushna) पूजा करतात . धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला मुक्ती मिळते, पाप-कष्टापासून मुक्ती मिळते, तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात. हे व्रत नियमाने केले तर जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते. या दिवशी पूजेच्या वेळी जया एकादशी व्रत कथेचे विशेष पठण केले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी शुक्रवार, 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.52 वाजता सुरू होईल, आणि ती दुसऱ्या दिवशी, 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.27 पर्यंत संपेल. अशा परिस्थितीत 2022 मध्ये जया एकादशी पूजेचा मुहूर्त आणि पारणाच्या वेळापराना वेळ म्हणजे काय ? हे जाणून घेऊयात.

जया एकादशी 2022 तारीख आणि पूजेचा शुभ काळ
हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी शुक्रवार, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी 1.52 वाजता सुरू होईल, आणि ती दुसऱ्या दिवशी, 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.27 पर्यंत संपेल.
जया एकादशीचा हा शुभ काळ प्रत्येक प्रकारच्या शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. जया एकादशीच्या व्रतानंतरच राजा हरिश्चंद्र यांना त्यांचे हरलेले राज्य पुन्हा मिळाले आणि त्यांचे सर्व दु:ख दूर झाले अशी मान्यता आहे. या एकादशीला‘अन्नदा एकादशी’ किंवा ‘कामिका एकादशी’ असेही म्हणतात.

  • एकादशी तिथी प्रारंभ : 11 फेब्रुवारी रोजी शुक्रवार दुपारी 1.52 वाजता
  • एकादशी समाप्ती तिथी : 12 फेब्रुवारी रोजी शनिवार दुपारी 4,27 पर्यंत
  • पारायण शुभ वेळ : 13 फेब्रुवारी रविवार, सकाळी 07:01 ते 09:15

हे’ आहेत व्रताचे नियम
ज्यांना हे व्रत करायचे आहे, त्यांनी दशमीच्या तारखेपासून उपवासाच्या नियमांचे पालन सुरू केले पाहिजे. नियमांनुसार दशमीच्या रात्री उपवास ठेवणाऱ्यांनी सात्विक भोजन करावे. कांदा आणि लसूण घालून बनवलेले तामसिक अन्न घेऊ नये. तसेच, डाळ, चणे आणि बेसन पिठापासून बनवलेल्या गोष्टी खाऊ नयेत. मध खाणे देखील टाळावे. व्रत पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळले पाहिजे.

जया एकादशी 2022 पारणाची अचूक वेळ
जे 12 फेब्रुवारीला जया एकादशीचे व्रत करणार आहेत त्यांनी रविवार, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 07:01 ते 09:15 या वेळेत व्रत पूर्ण करावे. या दिवशी द्वादशी तिथी संध्याकाळी 06:42 वाजता समाप्त होईल. एकादशीचे व्रत नेहमी द्वादशी तिथी संपण्यापूर्वी सोडावे.

व्रताची विधी
एकादशीच्या दिवशी आंघोळ केल्यावर पूजेच्या ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर तिथे गंगेचे पाणी शिंपडावे. नंतर चौरस किंवा पाटावर पिवळ्या रंगाचे कापड घालून नारायणाची मूर्ती ठेवावी. भगवान विष्णूचे ध्यान करून व्रताचा संकल्प सोडवा आणि नंतर भक्तिभावाने आणि प्रेमाने त्याला धूप, दीप, चंदन, फळ, तीळ आणि पंचामृत अर्पण करावे. नंतर व्रताची कथा वाचून आरती करावी. त्यानंतर दिवसभर उपवास ठेवावा. रात्री फलाहार करू शकता. पण फक्त गोड फळे खावीत. शक्य असल्यास रात्रभर भजन कीर्तन करुन जागरण करावे. दुसर्‍या दिवशी म्हणजेच द्वादशीला स्नान करून, दान करावे आणि मग अन्न ग्रहण करावे. उपवासाच्या दिवशी कोणाची निंदा करु नये आणि मनात वैर वा क्रोध भाव आणू नये.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते, स्वत:चा आत्मसन्मान प्रिय असेल तर या 5 ठिकाणी अजिबात राहू नका

03 February 2022 Panchang | 3 फेब्रुवारी 2022, गुरुवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Ganesh Chaturthi 2022 | विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे पूजा होणार, जाणून घ्या माघ गणेश जयंतीचे महत्त्व पूजेची पद्धत