नागपंचमीला महादेवांना अर्पण करा या वस्तू; कालसर्प दोष होईल दूर

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक श्रावण महिन्याच्या शुल्क पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार जर या दिवशी नाग देवतांची पूजा, प्रार्थना केली तर त्या व्यक्तीला महादेवांचा आशीर्वाद मिळतो.

नागपंचमीला महादेवांना अर्पण करा या वस्तू; कालसर्प दोष होईल दूर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 20, 2025 | 4:42 PM

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक श्रावण महिन्याच्या शुल्क पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार जर या दिवशी नाग देवतांची पूजा, प्रार्थना केली तर त्या व्यक्तीला महादेवांचा आशीर्वाद मिळतो. नागपंचमीच्या दिवशी महादेवांना काही गोष्टी अपर्ण करणं शुभ मानलं जातं, जर तुम्ही देखील या वस्तू महादेवांना अर्पण केल्या तर तुम्हाला महादेवांची कृपा प्राप्त होतेच, सोबतच कालसर्प दोष देखील दूर होतो. जाणून घेऊयात नागपंचमीच्या दिवशी महादेवांना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात?

मध – महादेवांना मध अर्पण केल्यामुळे धनात वाढ होते, नागपंचमीला महादेवांना मध अर्पण केल्यास परीक्षेमध्ये यश मिळतं. व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभतं, रोगांपासून मुक्ती मिळते.

कच्च दूध – जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर नागपंचमीच्या दिवशी महादेवांना कच्च दूध अर्पण करा. यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल, नागपंचमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर महादेवांना दूध अर्पण करणं शुभ मानलं जातं.

धोतऱ्याचं फूल – नागपंचमीच्या दिवशी महादेवांना धोतऱ्याचं फूल अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात, कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.

बेलपत्र – बेलपत्र हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे, नागपंचमीच्या दिवशी महादेवांना बेलपत्र अर्पण केल्यास महादेवांचा आशीर्वाद मिळतो, कालसर्पदोष दूर होतो.

काळे तीळ – नागपंचमीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकू महादेवांना अभिषेक करणं शुभ मानलं जातं, यामुळे कालसर्प दोष दूर होतो, अशी मान्यता आहे.

कालसर्प दोष दूर करण्यासाठी काय करावं?

नागपंचमीच्या दिवशी महादेवाची पूजा करा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा

नागपंचमीच्या दिवशी चांदी किंवा तांब्यापासून बनवलेली नाग-नागिनची मूर्ती नदीला अर्पण करा

नागपंचमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि सात प्रदक्षिणा घाला.

कालसर्प दोष दूर करण्यासाठी महादेवांची पूजा करावी, श्रावण महिन्यात भक्ती भावाने  पूजा केल्यास काल सर्पदोष दूर होतो अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)