
हिंदू धर्मामध्ये पूजा आर्चा आणि प्रार्थनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्याची लाईफस्टाईल ही खूप फास्ट झाली आहे, त्यामुळे मंदिरात जाऊन दोन मिनिटं जरी पूजा आणि प्रार्थना केली तरी तुम्हाला प्रचंड धावपळीच्या जीवनातून थोडं तरी समाधान मिळतं, तुमचं मन शांत होतं.अशी मान्यता आहे की, देवाची पूजा केल्यानं, प्रार्थना केल्यानं तुमच्या आजूबाजूला जी नकारात्मक शक्ती आहे, तिचा नाश होऊन सकारात्मक शक्ती निर्माण होते. तिचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडतो. त्यामुळे अनेकजण वेळात वेळ काढून देवाचं दर्शन घेण्यासाठी दिवसातून एकदा का होत नाही, मंदिरात जातात.
तुम्हालाही अनेकदा असा अनुभव आला असेल की, तुम्ही मंदिरात देवाच्या दर्शनाला जातात आणि तेथील पुजारी तुम्हाला देवाचा प्रसाद म्हणून देवाच्या चरणावर अर्पण केलेलं फूल किंवा देवाच्या गळ्यातील हार देतात. आपण तो हार किंवा फूल मोठ्या भक्तिभावानं घरी आणतो, मात्र अनेकदा आपल्याला हे माहीतच नसतं की त्या फुलांचं किंवा हाराचं करायचं काय? चला तर मग जाणून घेऊयात.
जेव्हा तुम्ही मंदिरात दर्शनासाठी जातात आणि तिथे तुम्हाला जर पुजाऱ्यानं फुलं दिली तर सर्वात आधी त्यांचं दर्शन घ्या, ते फुलं तुमच्या कपाळाला लावा, त्यांना घरी आणा आणि तुमच्या देवघरात ठेवा. जेव्हा ही फुलं सुकू लागतील तेव्हा त्या फुलांना तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पाकिटात देखील ठेवू शकता. असं करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घरात कधीही धनाची कमी भासत नाही.
ही चूक करू नका?
इथे एक गोष्ट लक्ष ठेवा जर तुम्ही एखाद्या तिर्थस्थळी फिरायला गेला असाल आणि तिथे जर तुम्हाला प्रसाद म्हणून फुलं किंवा हार मिळाला तर त्याला तुमच्यासोबत आणू नका कारण प्रवासामध्ये तो खराब होऊ शकतो. त्याऐवजी त्याचं दर्शन घेऊन त्याला एखाद्या झाडाखाली ठेवा किंवा वाहात्या पाण्यात प्रवाहित करा.