Pradosh Vrat: मे महिन्यात प्रदोष व्रत कधी?, जाणून घ्या पुजेचा शुभ मुहूर्त आणि महत्व

| Updated on: May 10, 2022 | 4:17 PM

शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी महादेवाला समर्पित आहे. ही तिथी महिन्यात दोन वेळा असते. यादिवशी प्रदोष व्रत केले जाते.

Pradosh Vrat: मे महिन्यात प्रदोष व्रत कधी?, जाणून घ्या पुजेचा शुभ मुहूर्त आणि महत्व
Follow us on

हिंदू धर्मात प्रदोष व्रताचे (Pradosh Vrat) विशेष महत्व आहे. हा दिवस महादेवाला समर्पित आहे. यादिवशी विधिवत महादेवाची पूजा केली जाते आणि व्रत ठेवले जाते. मे महिन्यात हे व्रत कधी ठेवले जाईल जाणून घेऊया.

हिंदू धर्माच्या (Hindu Dharma) मान्यतेनुसार प्रत्येक महिन्यात दोन पक्ष येतात. त्यात एक कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी महादेवाला समर्पित आहे. ही तिथी महिन्यात दोन वेळा असते. यादिवशी प्रदोष व्रत केले जाते. शंकराच्या पिंडीची (Lord Shiva) विधीवत पूजा केली जाते. हा व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हिंदू धर्मात याव्रातचे विशेष महत्व आहे. हा व्रत फलदायी मानला जातो. हा व्रत ठेवल्याने व्यक्तिला मोक्ष प्राप्त होतो. मे महिन्यात हा व्रत कधी ठेवला जाईल. जाणून घ्या हा व्रत कसा करावा विधीवत पूजा कशी करावी आणि त्याचे महत्व काय आहे .

प्रदोष व्रत कधी करावे?

हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी 13 मे 2022 शुक्रवारी आहे. यादिवशी प्रदोष व्रत करावे. यातिथीची सुरवात संध्याकाळी 5:27 पासून आहे. यातिथीचे समापन 14 मे शनिवार दुपारी 03:22 वाजता होईल. याव्रताचे पूजन प्रदोष काळात केले जाते. प्रदोष काळ 13 मे ला आहे. त्यामुळे प्रदोष व्रत 13 मे ला करावे. पूजेचा शुभ मुहूर्त 13 मे 2022 संध्याकाळी 07: 04 पासून रात्री 09:09 पर्यंत असेल. यादिवशी संध्याकाळी 3:45 पासून सिद्धि योग लागू होतोय.

शुक्र प्रदोष व्रताचे महत्व

हिंदू धर्मात याव्रताचे विशेष महत्व आहे. असं मानलं जातं यादिवशी व्रत केल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळती. यादिवशी व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हा व्रक केल्याने संतान प्राप्तिची इच्छा लवकर पूर्ण होते. हे व्रत मुलांच्या आरोग्यासाठी खूप फलदायी मानले गेले आहे. यादिवशी माता पार्वती आणि महादेवाची पूजा केल्याने सर्व कष्टांतून मुक्ती मिळते.

पुजेचा विधी

यादिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करा. स्वच्छ कपडे घाला. देव घराची स्वच्छता करा. देवाची पाण्याने स्वच्छ करा. नवे वस्त्र परिधान करा. शिव लिंगाला स्नान घाला. शिवाचे स्मरण करत व्रत आणि पुजा करा. संध्याकाळी शुभ मुहूर्त प्रदोष काळात शिव पर्वातीची पुजा करा. पुजेच्या काळात शिवलिंगाला गंगाजल आणि गाईच्या कच्या दुधाने स्नान घाला. ये खूप फलदायी असते. पुजे नंतर शिव चालीसा चे पठण करा. शंकराच्या पिंडींजवळ आरती करा. नैवेद्य अर्पण करा.

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)